अखेर तो क्षण आला! रमा-अक्षयची होणार भेट? 'मुरांबा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:30 IST2025-02-05T13:28:38+5:302025-02-05T13:30:35+5:30

'मुरांबा' मालिकेत येणार नवा ट्विस्ट; प्रोमो पाहिलात का?

star pravah muramba serial takes an exciting turn will rama meet akshay new promo viral | अखेर तो क्षण आला! रमा-अक्षयची होणार भेट? 'मुरांबा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर 

अखेर तो क्षण आला! रमा-अक्षयची होणार भेट? 'मुरांबा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर 

Muramba New Promo: छोट्या पडद्यावरील 'मुरांबा' (Muramba) ही मालिका प्रेक्षकांना आवडणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. गेली काही वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मुरांबा मालिकेचा टीआरपी देखील चांगला आहे. मालिकेत अभिनेता शशांक केतकर (shashank Ketkar) आणि शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. दरम्यान, शशांक मालिकेमध्ये अक्षय नावाचं पात्र साकारतो आहे तर शिवानी रमा आणि माही या दुहेरी भूमिकेत दिसतेय. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय आणि नवनवीन ट्विस्ट मालिका रसिकांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच स्टार प्रवाह वाहिनीने नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा प्रोमो पाहून आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.  


नुकताच इन्स्टाग्रामवर 'मुरांबा' मालिकेचा प्रोमो समोर आलाय. या प्रोमोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. गेल्या काही दिवसांपासून रमा व अक्षय हे एकमेकांपासून वेगळे झाल्याचे दिसत आहे. त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं चित्र पाहायाला मिळतंय. याचं कारण म्हणजे रमाचा अपघात होऊन ती दरीत पडते. पण, अक्षयला ती अद्यापही सापडलेली नाही. त्यामुळे घरातील सर्वजण रमाचं निधन झालंय असं म्हणतात. परंतु ती जिवंत असल्याचा अक्षयला ठाम विश्वास असतो. त्यात माहीने रमाचे रुप घेतले असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सुरुवातीला रमा म्हणते "कोण आहे अक्षय?" त्यानंतर मध्येच साईनाथ शेवलकरचा (सिद्धार्थ खिरीड) आवाज येतो, "आई मी पुण्याला चाललोय", असं तो म्हणतो. पुढे रमा म्हणते, "हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. माझा भूतकाळ काय आहे? हे जाणून घेण्यासाठी मी पुण्याला जाणारचं." असं म्हणत रमा अक्षयच्या गाडीच्या डिकीमध्ये जाऊन बसते. 

पुढे साईनाथ अक्षयची गाडी चेक करत असताना त्यातून धूर बाहेर येत असल्याचं त्याच्या निदर्शनास येतं. त्यामुळे साईनाथ "मी काही मदत करु शकतो का?" असं अक्षयला विचारतो. तेव्हा अक्षयचा तो आवाज ऐकून रमाचा अंधुक आठवू लागतं. हा आवाज ओळखीचा का वाटतोय? असं ती म्हणते. त्याचदरम्यान, अक्षय नेमका रमा ज्या गाडीच्या डिकीमध्ये जाऊन बसते तिथे जातो आणि डिकी उघडतो. इथेच प्रोमो संपवण्यात आला आहे. त्यामुळेआता खरंच रमा-अक्षयची भेट होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Web Title: star pravah muramba serial takes an exciting turn will rama meet akshay new promo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.