या वाहिनीवरील पुरस्कार सोहळ्याने मिळवला टिआरपीत नं 1, याच वाहिनीवरील मालिका ठरतायेत अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 06:13 PM2021-04-16T18:13:40+5:302021-04-16T18:16:02+5:30
झी मराठी, स्टार प्रवाह आणि कलर्स मराठी या वाहिनीवरील परिवार पुरस्कार सोहळे नुकतेच आपल्यााल पाहायला मिळाले.
झी मराठी, स्टार प्रवाह आणि कलर्स मराठी या वाहिनीवरील परिवार पुरस्कार सोहळे नुकतेच आपल्यााल पाहायला मिळाले. पण टिआरपी रेसमध्ये स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याने बाजी मारत सगळ्यात जास्त टिआरपी मिळवला.
तर बार्क (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडिया) च्या रिपोर्टनुसार स्टार प्रवाह वरील मालिका टिआरपी चार्टमध्ये पहिल्या पाचमध्ये दिसत आहेत. फुलाला सुगंध मातीचा ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर असून आजही अनेक कुटुंबांमध्ये मुलीचं शिक्षण हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं वर्चस्व जरी पाहायला मिळत असलं तरी लग्नानंतर तिने घरी धुणी भांडी करावीत, घरसंसारात स्वत:ला झोकून द्यावं अशी अपेक्षा सासरच्या मंडळींकडून केली जाते. मात्र एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. एकमेकांत मिसळून फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेची गोष्ट अशाच स्वप्नांना पूर्ण करणाऱ्या संसाराची आहे.
मुलगी झाली हो ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुलगी झाली हो या मालिकेची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत एका महिलेने सगळ्यांचा विरोध पत्करून मुलीला जन्म दिला आहे इतकंच नाही तर एकटीने तिची संपूर्ण जबाबदारीही स्वीकारली आहे.
चौथ्या क्रमांकावर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आहे.
पाचव्या क्रमांकावर रंग माझा वेगळा ही मालिका आहे. या मालिकेच्या कथानकाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. रंगावरून, वर्णावरून मान अपमानाच्या अनेक गोष्टी आपण ऐकतो. याच विषयावर आधारित ही मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे.