मुक्तासमोर सईला पुन्हा मिळवण्याचं मोठं आव्हान; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवं वळण, पाहा प्रोमो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:56 IST2025-02-06T12:52:10+5:302025-02-06T12:56:12+5:30

'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht) या मालिकेमध्ये दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

star pravah premachi goshta serial new twist mukta faces a big challenge to get sai custody back promo viral | मुक्तासमोर सईला पुन्हा मिळवण्याचं मोठं आव्हान; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवं वळण, पाहा प्रोमो 

मुक्तासमोर सईला पुन्हा मिळवण्याचं मोठं आव्हान; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवं वळण, पाहा प्रोमो 

Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेमध्ये दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. याच कारणामुळे ही मालिका प्रेक्षकांना आवडते आहे. मालिकेतील सागर-ंमुक्ताची जोडी घराघरात पोहोचली आहे.  याशिवाय सई, माधवी, पुरू, इंद्रा, जयंत कोळी या पात्रांनी प्रेक्षकांना आपलंसं केलंय. सध्या प्रेमाची गोष्टमध्ये मालिकेत सध्या आदित्यची कस्टडी घेण्यासाठी मुक्ता आणि सागर प्रयत्न करत असल्याचा सीक्वेंस चालू आहे. परंतु यावेळी सुद्धा सावनी नवं कारस्थान रचते आणि मुक्ता-सागरला त्रास देण्याचा प्रयत्न करते. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर समोर आला आहे. या प्रोमोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.


'प्रेमाची गोष्ट' मालिकेमध्ये आदित्यची कस्टडी मिळवण्यासाठी सागर-मुक्ता प्रयत्न करत आहेत. परंतु त्यासाठी तयार केलेल्या ॲग्रिमेंटच्या कागदपत्रांमध्ये सावनी मोठ्या चालाखीने आदित्यच्या बदल्यात सई तिच्याकडे राहणार असा कागद ठेवते. या कागदपत्रांवर सागर सह्या करतो आणि सावनीच्या जाळ्यात फसतो. त्यामुळे आता आदित्यच्या बदल्यात सावनी सईला आपल्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. आता या सगळ्या प्रकरणामुळे मुक्ता पूर्णपणे खचून गेली आहे. आपली लेक आपल्यापासून दुरावू नये यासाठी ती वाट्टेल ते करते आहे. दरम्यान सोशल मीडियावर स्टार प्रवाह वाहिनीने यापुढील भागाचा प्रोमो शेअर केला आहे. तो प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की, सई मुक्ताला म्हणते, तू मला सोडून कुठेच जाणार नाहीस ना? तिला जावंच लागेल असं सावनी सईला सांगते."

पुढे प्रोमोमध्ये दिसतंय की, "सावनी मुक्ताला बोलते तुझ्या काळजाच्या तुकड्याला तुझ्यापासून लांब केलंच गं...!" सावनीचे ते शब्द ऐकून मुक्ता सईला आपल्याकडे खेचून घेते. त्यानंतर ती सावनीला ठणकावून सांगते. "मुलांना सांभाळायला मायेचा पदर लागतो, येत्या ४ दिवसांत माझी मुलगी कायद्याने माझ्याजवळ असेल." हा धमाकेदार प्रोमो सध्या चर्चेत आहे. आता या लढाईत मुक्ता जिंकणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Web Title: star pravah premachi goshta serial new twist mukta faces a big challenge to get sai custody back promo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.