पोस्ट करताच अभिनेत्याला २४ तासांच्या आत मिळाले थकलेले पैसे, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 11:10 AM2024-08-23T11:10:46+5:302024-08-23T11:11:28+5:30

मानधन वेळेत न मिळण्याबाबत अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्टर करत नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्याला त्याचे पैसे मिळाले आहेत.

Star Pravah Serial Muramba and Sukh Kalale serial Fame Aashay Kulkarni got his due money by producer | पोस्ट करताच अभिनेत्याला २४ तासांच्या आत मिळाले थकलेले पैसे, म्हणाला...

पोस्ट करताच अभिनेत्याला २४ तासांच्या आत मिळाले थकलेले पैसे, म्हणाला...

Marathi Actor Aashay Kulkarni :  मराठी कलाकारांकडून अनेकदा मानधन वेळेत न मिळाल्याची तक्रार केली जाते. काम पूर्ण करुनही त्यांना  हक्काचं मानधनदेखील मिळत नाही. असचं काहीसं घडलं होतं  मराठी मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच आशय कुलकर्णीसोबत(Aashay Kulkarni). काही दिवसांपूर्वीच त्याने एका मालिकेत काम केलं होतं. परंतु, निर्मात्यांनी त्याचं मानधन अद्याप अभिनेत्याला दिलं नव्हतं. अखेर त्याने सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केल्यानंतर २४ तासांच्या आत त्याला त्याचे थकलेले पैसे मिळाले. 

आशयने पैसे मिळाल्यानंतर चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहलं, "मिळाले! माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, हितचिंतक, तुमच्या पाठींब्यासाठी धन्यवाद". मात्र ही पोस्ट लिहित असताना त्याने मालिकेचं नाव घेणं टाळलं. 

आशय कुलकर्णीने  इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत एका मालिकेच्या प्रोडक्शन टीमवर टीका केली होती. त्याने लिहलं होतं, "मध्यंतरी मी एका मालिकेत काम केलं. मालिकेने नुकताच ८०० भागांचा टप्पा पार केला. त्या शोचे प्रोडक्शन मॅनेजर, अकाऊंट डिपार्टमेंट, त्या शोचे EP यांना वारंवार फोन केले, मेसेज केले, ई-मेल केले तरी पैसे मिळत नाहीयेत. आमच्याकडून रोज शूटला येण्याची अपेक्षा असते तेही ‘वेळेत’ पण मग वेळेत पैसे देता का येत नाहीत?". त्याच्या या पोस्टनंतर संबंधित प्रोडक्शन टीमने लगेचच तातडीने पाऊले उचलली. 

आशय सध्या कलर्स मराठीवरील 'सुख कळले' मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशीसोबत मुख्य भूमिकेत आहे. सोशल मीडियावर तो वैयक्तिक आयुष्यासह त्याच्या मालिकांविषयी पोस्ट करत असतो. 'सुख कळले'च्या आधी आशयने  'मुरांबा'मध्ये काम केलं होतं. यापुर्वी आशयने 'माझा होशील ना', 'पाहिले न मी तुला' या मालिकांमध्ये काम केले आहे. तो 'व्हिक्टोरिया' सिनेमातही महत्त्वाच्या भूमिकेत होता.

Web Title: Star Pravah Serial Muramba and Sukh Kalale serial Fame Aashay Kulkarni got his due money by producer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.