'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, अभिनेता पोस्ट शेअर करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 17:06 IST2024-03-02T17:03:36+5:302024-03-02T17:06:46+5:30
स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेत अर्जून सुभेदार हे पात्र साकारत अभिनेता अमित भानुशाली प्रकाशझोतात आला.

'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, अभिनेता पोस्ट शेअर करत म्हणाला...
Amit Bhanushali :स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेत अर्जून सुभेदार हे पात्र साकारत अभिनेता अमित भानुशाली प्रकाशझोतात आला. पण सध्या हा अभिनेता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
अभिनेता अमित भानुशाली हा 'ठरलं तर मग' या मालिकेतून घराघरात पोहचला. त्याने साकारलेली वकिलाची भूमिका चाहत्यांना भलतीच आवडली आहे. या मालिकेतील सायली-अर्जूनची केमेस्ट्री लोकांच्या पसंतीस पडली आहे. पण नुकताच अभिनेत्यासोबत गैरप्रकार घडला आहे.
टीआरपीच्या शर्यतीत नंबर- १ असलेल्या मालिकेची सर्वत्र चर्चा आहेच, पण सध्या यातील मुख्य पात्र साकारत असलेला अमित चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. त्यामागील कारण ऐकून त्याच्या चाहत्यांना धक्काच बसेल. नुकतीच अमितने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून माहिती देत त्याच्या नावाचा वापर करत लोकांची लूट होत असलेल्याचा खुलासा त्याने केला. अमित भानुशालीचं बनावट अकाऊंट बनवून पैसे लुबाडण्याचा डाव, रचलेल्या एका यूजरचा त्याने पर्दाफाश केलाय.
अमित भानुशाली फॅनपेज या पेजवरून अभिनेत्याच्या नावे एक अज्ञात यूजर नेटकऱ्यांकडून पैसे उकळवण्याचा प्रयत्न करत होता. ही बाब अमितच्या लक्षात येताच त्याने आपल्या चाहत्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. या बनावट अकाऊंटवरून अनेकांकडून पैशांची मागणी करण्यात आली आहे. तरी काही लोक या फसवणुकीला बळी देखील पडल्याचं देधील समजतंय. त्यामुळेच आता स्वतः अभिनेत्याने पोस्ट करून, सगळ्यांना या स्कॅमची माहिती दिली आहे.
'मला या डोनेशनबद्दल काही माहीत नाही... कृपया कोणी ही पैसे पाठवून नका' असं आवाहन त्याने या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना केलंय.