Tharla Tar Mag New Promo : अखेर अर्जुन देणार त्याच्या प्रेमाची कबुली; एसटी स्टँडवर सायलीला केलं प्रपोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 12:31 IST2024-12-24T12:26:52+5:302024-12-24T12:31:07+5:30
'ठरलं तर मग' या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Tharla Tar Mag New Promo : अखेर अर्जुन देणार त्याच्या प्रेमाची कबुली; एसटी स्टँडवर सायलीला केलं प्रपोज
Tharla Tar Mag New Promo :स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांची आवडती बनली. गेली दोन वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. मालिकेतील सायली-अर्जुनच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दरम्यान, 'ठरलं तर मग' मालिकेमध्ये सुभेदारांच्या घरातून अर्जुनची पत्नी म्हणजेच सायलीला हाकलून दिल्याचा सीक्वेन्स चालू आहे. शिवाय अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य प्रियाने सगळ्यांसमोर उघड केल्याने त्यांची ताटातूट झाली आहे. त्यामुळे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्याची खंत अर्जुनला अजूनही सतावते.
सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आल्याने सुभेदारांच्या घरातील प्रत्येक माणूस सायलीचा तिरस्कार करू लागला आहे. त्याचबरोबर मधूभाऊ देखील या सगळ्याचा दोष सायलीला देतात. दरम्यान, नुकताच स्टार प्रवाह वाहिनीकडून या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हायरल प्रोमो पाहून नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला.
सोशल मीडियावर 'ठरलं तर मग' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये दिसतंय की, सायली आणि कुसुमताई एका एसटी स्टॅंडवर बसलेल्या दिसत आहेत. राहतं शहर आणि अर्जुनला सोडून सायली दूर जात आहे. परंतु या सगळ्याची माहिती मिळताच अर्जुन एसटी स्टॅंडवर जातो आणि सगळीकडे सायलीला शोधतो. परंतु कुठेही त्याला सायली दिसत नाही. मिसेस सायली आपल्याला कायमच्या सोडून गेल्या की काय याचं त्याला टेन्शन येतं.
त्याचवेळी सायली कुसुमताई देखील बसमध्ये जाण्यासाठी स्थानकातून बाहेर येतात. त्यादरम्यान, अर्जुनला बस स्थानकाच्या तिकीट काउंटवर जाऊन तो कोणतीही पर्वा न करता सगळ्यांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देतो. त्यावेळी अर्जुन म्हणतोय- "मिसेस सायली! आज मला अख्या जगासमोर सांगायचंय; आय लव्ह यू मिसेस सायली, आय लव्ह यू!" आणि इथेच हा प्रोमो संपला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या रविवारी म्हणजेच २९ डिसेंबरला दुपारी १ आणि रात्री ८ वाजता या मालिकेचा महाएपिसोड प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान, अर्जुन-सायलीने एकमेकांना स्विकारल्यानंतर सुभेदार कुटुंबीयांची आता काय प्रतिक्रिया असणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.