अखेर अर्जुनच्या मनातलं ओठांवर येणार? 'ठरलं तर मग' मालिकेत रोमँटिक वळण; प्रोमो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 10:55 IST2024-11-27T10:53:44+5:302024-11-27T10:55:54+5:30
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये (Tharla Tar Mag) दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

अखेर अर्जुनच्या मनातलं ओठांवर येणार? 'ठरलं तर मग' मालिकेत रोमँटिक वळण; प्रोमो व्हायरल
Tharla Tar Mag: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये (Tharla Tar Mag) दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. कॉन्ट्रॅ्क्ट मॅरेज पद्धतीने केलेलं लग्न टिकावं यासाठी सायली-अर्जुन आता प्रयत्न करू लागले आहेत. सध्या या मालिकेत सायली-अर्जुनच्या मनात एकमेकांविषयी प्रेमाच्या भावना निर्माण होत असल्याचा सीक्वेंस चालू आहे. दिवाळीच्या दिवशीच अर्जुन मधूभाऊंची जामीनावर सुटका करुन आणतो. परंतु आता सायली कॉन्ट्रॅक्टनुसार सुभेदारांचं घर सोडून निघून जाणार यांचं टेन्शन अर्जुनला सतावत असतं. त्याआधीच आपल्या मनातील भावना सायलीला सांगून मोकळं व्हावं असं अर्जुन ठरवतो. दरम्यान,‘स्टार प्रवाह’ वाहिनीने नुकताच एक प्रोमो ( Tharala Tar Mag ) सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या प्रोमोमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये अर्जुन हा सायलीला रोमँटिक अंदाजात प्रपोज करणार असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात या प्रोमोच्या बॅकग्राऊंडला 'ठरलं तर मग' मालिकेचं गाणं सुरु असताना अर्जुनची एन्ट्री होते. सायली रेस्टॉरंटच्या टेबलवर गालाला हात लावून नवऱ्याची वाट पाहत बसलेली असते. त्यावेळी सायलीच्यासमोर टेबलवर गुलाब अन् चाफ्याची फुलं असतात. त्यानंतर अर्जुन रेस्टॉरंमध्ये येतो आणि दोघेही एकमेकांकडे एकटक पाहत राहतात आणि म्हणतात, ‘मला तुम्हाला काहीतरी सांगायचं, यादरम्यान, अर्जुन त्याच्या खिशातून अंगठी सुद्धा आणतो आणि तो सायलीला म्हणतो, “आय…” आणि इथेच प्रोमो संपतो. या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मालिकेचे प्रेक्षक देखील अर्जुन-सायली एकमेकांना आपल्या मनातील भावना केव्हा व्यक्त करणार याची वाट पाहात होते. त्यामुळे आता मालिकेचा नवा प्रोमो समोर आल्याने सायली-अर्जुन एकमेकांसमोर व्यक्त होणार का? हे पाहण्यासाठी पाहणं औत्सुक्याचं आहे.