'थोडं तुझं आणि थोडं माझं'मध्ये नवा ट्विस्ट; मानसी घेणार रणजीतच्या कंपनीतील नोकरी सोडण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 12:55 IST2025-02-01T12:52:42+5:302025-02-01T12:55:52+5:30
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'थोडं तुझं आणि थोडं माझं' (Thoda Tuza Thoda Maza ) ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे.

'थोडं तुझं आणि थोडं माझं'मध्ये नवा ट्विस्ट; मानसी घेणार रणजीतच्या कंपनीतील नोकरी सोडण्याचा निर्णय
Thoda Tuza Thoda Maza : स्टार प्रवाह वाहिनीवरील 'थोडं तुझं आणि थोडं माझं' (Thoda Tuza Thoda Maza ) ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. या मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांच्या पसंती मिळते आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि समीर परांजपे (Sameer Paranjape) मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. 'थोडं तुझं आणि थोडं माझं' शिवानीने मानसी हे पात्र साकारलंय तर समीरने तेजस प्रभू नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. दरम्यान, या मालिकेत दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेत भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपाखाली तेजसला अटक करण्यात आल्याचा सीक्वेंस चालू आहे. अशातच नुकताच 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतील नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये मानसी रणीजतच्या कंपनीमधून नोकरी सोडण्याचा निर्णय घेते. त्यामुळे प्रेक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
सोशल मीडियावर स्टार प्रवाह वाहिनीकडून 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहेत. अलिकडेच मालिकेत दाखवण्यात आलं होतं की, आपल्या कामाच्या ठिकाणी लाच घेतल्याच्या प्रकरणी तेजस प्रभूला अटक करण्यात येते. शिवाय त्याच्यावर कोर्टात हजर करण्यात येतं. परंतु मानसीच्या मदतीने तेजसची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता होते.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या नव्या प्रोमोमध्ये दिसतंय की, प्रभू निवासमध्ये सगळे एकत्र बसले असताना मानसी तिचा बॉस रणजीतच्या हातात रेजिग्नेशन लेटर देते. त्यावेळी मानसी त्याला म्हणते, "हे माझ्या घरच्यांसमोर तुम्हाला द्यायचं होतं." मानसीचं रेजिक्नेशन लेटर पाहून रणजीतच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो.
पुढे मानसीच्या मोठ्या जाऊबाई तिला जाब विचारत म्हणतात, "नोकरी सोडायला मूर्ख आहेस का तू? गायत्रीच्या या प्रश्नाचं ठामपणे उत्तर देत मानसी तिला सांगते- "ज्या कंपनीच्या लोकांनी माझ्या नवऱ्याला भ्रष्टाचाऱ्याच्या खोट्या आरोपात अडकवलं. मला त्या कंपनीत काम करायचं नाही." मानसीच्या या निर्णयामुळे मालिकेत मोठं रंजक वळण येणार आहे. आता मालिकेत नक्की काय घडणार हे जाणून घेण्यासाठी 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिका पाहावी लागेल.