नात्यातल्या हळुवार धाग्याची गोष्ट! 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 01:02 PM2024-12-11T13:02:02+5:302024-12-11T13:04:39+5:30

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच मल्टिस्टारर मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' (Lagnanatr hoilch Prem) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

star pravah upcoming lagnananter hoilch prem serial watch new promo mrunal dusanis and dnyanada ramtirthkar play lead role | नात्यातल्या हळुवार धाग्याची गोष्ट! 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित 

नात्यातल्या हळुवार धाग्याची गोष्ट! 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित 

Lagnanatr hoilch Prem: स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच मल्टिस्टारर मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' (Lagnanatr hoilch Prem) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) ४ वर्षांच्या ब्रेकनंतर मालिकाविश्वात कमबॅक करत आहे. दरम्यान, या मालिकेची सध्या सर्वत्र तुफान चर्चा होताना दिसत आहे. मृणालसोबत 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar), विजय आंदळकर तसेच विवेक सांगळे या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या प्रोमोमध्ये मृणाल आणि ज्ञानदाची केमिस्ट्री पाहायला मिळते आहे. 


अभिनेत्री मृणाल दुसानिस या मालिकेत नंदिनी मोहिते पाटील नावाचं पात्र साकारणार आहे. तर ज्ञानदा रामतीर्थकर मालिकेत मृणाल दुसानिसचं बहीण म्हणजेच काव्या मोहिते पाटील या भूमिकेत दिसणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की, नंदिनी आणि काव्या बेडवर झोपल्या असताना अचानक मध्येच घोरण्याचा आवाज येतो. काव्या म्हणजेच (ज्ञानदा) मुद्दामहून नंदिनीच्या कानाजवळ जाऊन घोरण्याचा आवाज काढत तिला त्रास देत असते. त्यावेळी नंदिनीला काव्याची नाटकं लक्षात येतात आणि नंदिनी तिला फटकारते. 

या प्रोमोमध्ये नंदिनी म्हणते की, काव्या! कानात काय घोरतेस गं? त्यावर उत्तर देताना काव्या म्हणते, ताई! आता तुझं अरेंज मॅरेज होणार आहे. त्यामुळे तुझे होणारे अहो, घोरणाऱ्यांपैकी असतील तर, म्हणून सांगते बाई! आतापासूनच सवय करून घे. मग नंदिनी काव्याला म्हणते काव्या हे बघ एकतर मी त्यांची सवय बदलेन किंवा नाही तर मी स्वत: सवय करून घेईन.असं म्हणत ती काव्याला उशीर फेकून मारते त्यानंतर त्या दोघींची मजामस्ती चालू होते. 

'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेचा हा नवा प्रोमो नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. शिवाय मृणाल-ज्ञानदाच्या चाहत्यांनी याप प्रोमोवर तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. येत्या १६ डिसेंबरपासून सायंकाळी ७ वाजता ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही उत्सुक झाले आहेत. 

Web Title: star pravah upcoming lagnananter hoilch prem serial watch new promo mrunal dusanis and dnyanada ramtirthkar play lead role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.