अखेर मंजिरी रायाला सांगणार त्याच्या कुटुंबाचं सत्य; 'येड लागलं प्रेमाचं' मालिका उत्कंठावर्धक वळणावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:18 IST2025-02-27T18:14:24+5:302025-02-27T18:18:46+5:30
'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे.

अखेर मंजिरी रायाला सांगणार त्याच्या कुटुंबाचं सत्य; 'येड लागलं प्रेमाचं' मालिका उत्कंठावर्धक वळणावर
Yed lagla Preacha: 'येड लागलं प्रेमाचं' (Yed lagla Premach) ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. 'बिग बॉस' फेम विशाल आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांची मुख्य भूमिका असेलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दिवसेंदिवस मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. सध्या 'येड लागलं प्रेमाचं' मध्ये मंजिरी रायाच्या हरवलेल्या कुटुंबाचा शोध घेत असल्याचा सीक्वेंस चालू आहे. लहानपणीच आई-वडिलांच्या मायेपासून दूर राहिलेल्या रायाचं कुटुंब जिवंत असल्याचं मोठं रहस्य तिला समजणार आहे. लवकरच मालिकेत नवा ट्वि्स्ट पाहायला मिळणार आहे. मंजिरी रायाच्या हरवलेल्या भावाचा आणि आईचा शोध घेणार आहे. हा प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेचा जबरदस्त प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की मंजिराला रायाने भेट दिलेल्या लॉकेट सारखंच दुसरं एक लॉकेट तिच्या हाती लागतं. त्या लॉकेटमुळे रायाचं कुटंब जिवंत असल्याचा सुगावा तिच्या हाती लागला आहे. हे सत्य मंजिरी रायाला सांगणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढली आहे. लहानपणापासून आईच्या मायेला पोरका झालेल्या रायाला लवकर त्यांचं हरवलेलं कुटुंब परत मिळणार आहे. या मालिकेच्या नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा भाग कधी पाहता येणार यासाठी त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री १० वाजता प्रसारित केली जाते. मालिकेतील हा भाग प्रेक्षकांना शुक्रवारी 28 फेब्रुवारीच्या दिवशी पाहता येणार आहे.