'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत रोमँटिक वळण! राया मंजिरीसमोर व्यक्त करणार त्याचं प्रेम...; पाहा प्रोमो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 15:58 IST2025-02-16T15:56:23+5:302025-02-16T15:58:55+5:30
'येड लागलं प्रेमाचं' (Yed lagla Premach) ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत रोमँटिक वळण! राया मंजिरीसमोर व्यक्त करणार त्याचं प्रेम...; पाहा प्रोमो
Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' (Yed lagla Premach)ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरील सध्याच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेत अभिनेता विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची मुख्य भूमिका आहे. अभिनेत्री पूजा बिरारी, विशाल निकम, नीना कुलकर्णी, आतिशा नाईक, संग्राम साळवी अशी तगडी कलाकार मंडळी 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत पाहायला मिळत आहेत. दरम्यान, ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या मालिकेमध्ये मंजिरी आजारी असल्याचा सिक्वेस चालू आहे. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीच्या प्रेमाच्या गोष्टीने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. लवकरच मालिकेत नवा ट्वि्स्ट पाहायला मिळणार आहे. राया अखेर आपल्या मनातील प्रेम मंजिरीसमोर व्यक्त करणार आहे. हा प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढल्याचे दिसत आहे.
नुकताच सोशल मीडियावर 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की, हॉस्पिटलमध्ये असलेली मंजिरी रायासमोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत म्हणते, "राया मला इथून घेऊन चल.., मला मोकळं आकाश चांदणं बघायचं आहे. प्लीज राया...! मंजिरीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी राया एका बंद डब्यांमध्ये काजवे आणतो. त्यानंतर काडवे मंजिरीच्या रुममध्ये सोडतो.
पुढे राया मिस फायरला (मंजिरी) म्हणतो, "मिस फायर तुझ्यासाठी चांदण इथं घेऊन आलो आहे. रायाचे हे प्रयत्न पाहून मंजिरी त्याचं कौतुक करते आणि त्याला बोलते, "पण, आता दिवसच किती उरलेत माझे.... मंजिरीचे हे शब्द ऐकून राया पूर्णपणे तुटून जातो. मंजिरीचं ते बोलणं ऐकून राया भावुक होतो आणि तिला म्हणतो "मिस फायर मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. माझं तुझ्यावर प्रेम आहे." हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यावर कमेंट करीत अनेक अंदाज वर्तवले आहेत. आता हा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका दररोज रात्री १०.०० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केली जाते.