राजीव निगमने उचलले हे पाऊल,केले हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 10:58 AM2018-03-23T10:58:22+5:302018-03-23T16:28:22+5:30

‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत चैतूलाल या भ्रष्ट आणि सत्तेसाठी हपापलेल्या मुख्यमंत्र्याची भूमिका रंगविणारे राजीव निगम ...

This step taken by Rajiv Corporation has been done | राजीव निगमने उचलले हे पाऊल,केले हे काम

राजीव निगमने उचलले हे पाऊल,केले हे काम

googlenewsNext
र शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत चैतूलाल या भ्रष्ट आणि सत्तेसाठी हपापलेल्या मुख्यमंत्र्याची भूमिका रंगविणारे राजीव निगम हे मुळात विनोदी लेखक असून त्यांनी प्रदीर्घ काळ स्टॅण्ड-अप कॉमेडियन म्हणून आपली कला सादर केली होती. राजकीय परिस्थितीवर विडंबनात्मक भाष्य करण्यात त्यांचा हातखंडा आहे. राजकीय विडंबनात्मक मालिकेवरील राजीव निगम यांचे विचार सुस्पष्ट असून यासंदर्भात ते म्हणाले, “विनोदवीराकडे कोणत्याही राजकीय परिस्थितीवर तटस्थ मतप्रदर्शन करण्याची क्षमता असली पाहिजे. त्याने कोणत्याही पक्षाची बाजू घेता कामा नये. राजकीय विडंबनातून नेहमीच देशातील राजकीय परिस्थितीचं खरं चित्र प्रेक्षकांसमोर आलेलं असून विनोदवीराने निर्भयतेने आपल्या कलेचा आविष्कार केला पाहिजे.‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत राजकीय उपहासात्मक भाष्य हे कोणतीही अपराधीपणाची भावना न बाळगता व्यक्त केलं जातं.त्यातील चैतूलालच्या भूमिकेला न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे.”देशातील विद्यमान राजकीय स्थितीवर ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत उपहासात्मक भाष्य केले जाते. केवळ आपले खिसे भरण्यासाठी सत्ता प्राप्त करण्यास हपापलेल्या चैतूलाल या भ्रष्ट नेत्याच्या राजकीय कारस्थानांभोवती या मालिकेचे कथानक गुंफले आहे.

प्रत्येक भागात नवे राजकीय विडंबन,भ्रष्ट नेत्यांवरील तिरकस शेरेबाजी आणि पुरेपूर करमणुकीमुळे ‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत चालली आहे.नेहमीच्या सासू-सुनेच्या रटाळ कथांनी भरलेल्या मालिकांच्या विश्वात या मालिकेने आपल्या नावीन्यपूर्ण विषयामुळे ताज्या हवेची झुळूक आणली आहे.लोकांच्या सेवेपेक्षा आपले खिसे भरणे हेच ज्याचे सत्तासंपादण्यामागील ध्येय आहे, अशा चैतूलाल या भ्रष्ट राजकीय नेत्याची भूमिका या मालिकेत राजीव निगम साकारीत आहेत. गेली अनेक वर्षे विनोदी लेखन आणि स्टॅण्ड-अप कॉमेडियनचे काम केलेल्या राजीव निगम यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले आहे. ते सांगतात,“मी विनोदवीर बनण्यासाठीच मुंबईत आलो आणि माझ्या सुदैवाने मला तशी संधी मिळालीही. आज लोक मला विनोदी लेखक आणि कॉमेडियन म्हणून ओळखतात.माझ्या निश्चित अशा भावी योजना नाहीत, पण जोवर जिवंत आहे, तोपर्यंत मी लोकांना हसवीत राहीन, एवढे निश्चित.”या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे राजीव निगम यांचे ध्येय असून आजवर प्रेक्षकांनी आपल्याला जसा पाठिंबा आणि प्रेम दिले तसेच ते यापुढेही देत राहतील, अशी त्यांची अपेक्षा आहे.

Web Title: This step taken by Rajiv Corporation has been done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.