मुसकानच्या डोळ्यांत दडली आहे एक कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 07:37 AM2018-05-07T07:37:37+5:302018-05-07T14:57:36+5:30
लहानपण हे सर्वांच्याच आयुष्यातील सर्वांत सोनेरी दिवस असतात.अशाच चांगल्या सोनेरी दिवसाची आठवण करून द्यायला 'मुसकान' हा शो सुरू होत ...
ल ानपण हे सर्वांच्याच आयुष्यातील सर्वांत सोनेरी दिवस असतात.अशाच चांगल्या सोनेरी दिवसाची आठवण करून द्यायला 'मुसकान' हा शो सुरू होत आहे. एका लहान मुलीच्या सर्वसामान्यांपेक्षा वेगळ्या अशा बालपणाची कथा यात रसिकांना पाहायला मिळणार आहे. ही एक हृदय पिळवटून टाकणारी कथा आहे आई आणि मुलीची. एक आई आपल्या ह्या मुलीला एका बॉक्समध्ये का लपवत आहे? मुसकान ही कथा आहे एका ७ वर्षीय मुलीच्या नजरेतून. सोनाक्षी सावे ह्या ७ वर्षीय मुलगी मुसकानची भूमिका साकारत आहे. मुसकान एखाद्या बाहुलीसारखी दिसते. ती फ्रॉक घालते आणि दोन पोनीटेल्स बांधते. तिच्या फ्रॉक्सचे वैशिष्ट्य हे आहे की ते जुन्या साड्या आणि ड्रेसेस वापरून बनवण्यात आले आहेत. ही व्यक्तिरेखा अनेक नकार, धोके, असुरक्षितात आणि कठीण गोष्टींना सामोरी जाते, पण ह्या गोष्टींचा ह्या छोट्या मुलीला सामना करावा लागत नाही. त्यांचा सामना करते तिची आई, आरती ऊर्फ अरीना डे. सोनाक्षीने मुसकानच्या रूपात उत्तम काम केले असून कदाचित तिच्याशिवाय आणखी कोणी ही भूमिका करूच शकले नसते. सोनाक्षी म्हणते, “मुसकानची भूमिका करण्याबद्दल मी अतिशय उत्साहात आहे.आमच्या पहिल्या प्रोमोसाठी अख्ख्या टीमला खुप कौतुक मिळाले असून सगळेच हा शो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मला खात्री आहे की लोकांना ह्या शो चा लूक आणि व्यक्तिरेखा नक्कीच आवडेल.”
cnxoldfiles/a>'कुल्फी कुमार बाजेवाला' मालिकेबरोबरच नवी मालिका ‘मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह’मालिकेतही आकृती शर्मा ही सात वर्षाची चिमुरडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.'कुल्फी कुमार बाजेवाला'अल्पावधीतच या मालिकेला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे 'कुल्फी कुमार बाजेवाला'प्रमाणेच 'मुसकान'ही मालिका रसिकांचे मनं जिंकण्यात यशस्वी ठरेल असा निर्मात्यांना विश्वास आहे.