उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा, 'उदे गं अंबे उदे' मालिकेचा 'मुहूर्त' महेश कोठारेंच्या हस्ते संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 11:13 AM2024-08-05T11:13:49+5:302024-08-05T11:14:05+5:30

महेश कोठारे नवीन मालिकेतून साडेतीन शक्तिपाठांची कथा लोकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत (mahesh kothare)

story of three and a half Shaktipeeth of devi ude ga ambe marathi serial by mahesh kothare | उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा, 'उदे गं अंबे उदे' मालिकेचा 'मुहूर्त' महेश कोठारेंच्या हस्ते संपन्न

उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा, 'उदे गं अंबे उदे' मालिकेचा 'मुहूर्त' महेश कोठारेंच्या हस्ते संपन्न

स्टार प्रवाहवर सध्या नवनवीन मालिका पाहायला मिळत आहेत. अशातच दिग्दर्शक-निर्माते आणि अभिनेते महेश कोठारेस्टार प्रवाहवर नवी पौराणिक मालिका घेऊन येणार आहेत. 'विठुमाऊली' आणि 'दख्खनचा राजा जोतिबा'च्या यशानंतर स्टार प्रवाह चॅनलवर नवी पौराणिक मालिका ‘उदे गं अंबे... कथा साडेतीन शक्तिपीठांची’ दिसणार आहे. या पौराणिका मालिकेचा मुहूर्त शॉट संपन्न झाला. यावेळी महेश कोठारे फेटा घालताना दिसले असून त्यांनी गणपती बाप्पा आणि आदिशक्तीची पूजा करुन मालिकेच्या शूटींगला सुरुवात केली.

साडेतीन शक्तिपाठांचा इतिहास उलगडणार

 देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थानं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची कोठारे व्हिजन्स प्रायव्हेट लिमिटेड ही निर्मिती संस्था या भव्य मालिकेची निर्मिती करणार आहे. निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची या मालिकेचा मुहूर्त सोहळा पार पडला. 


महेश कोठारे नव्या मालिकेविषयी काय म्हणाले?

याप्रसंगी महेश कोठारे म्हणाले, ‘स्टार प्रवाहसोबत खूप जुने ऋणानुबंध आहेत. मन उधाण वाऱ्याचे ही पहिली मालिका स्टार प्रवाहसोबत केली होती. त्यानंतर विठुमाऊली, दख्खनचा राजा जोतिबा, पिंकीचा विजय असो, सुख म्हणजे नक्की काय असतं अश्या सुपरहिट मालिका केल्या. उदे गं अबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची या महामालिकेतून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा उलगडण्यात येणार आहे. ही मालिकाही भव्यदिव्य असेल यात शंका नाही. या भव्यदिव्य मालिकेतून कोणकोणते कलाकार भेटीला येणार? सेट कसा असेल? याविषयी प्रेक्षकांना लवकरच कळेल. या नव्या प्रोजेक्टसाठी प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळावेत हीच इच्छा व्यक्त करेन. नक्की पहा उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.’

Web Title: story of three and a half Shaktipeeth of devi ude ga ambe marathi serial by mahesh kothare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.