​बढो बहू या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार दंगल चित्रपटासारखी कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2017 03:51 PM2017-01-19T15:51:35+5:302017-01-19T15:51:35+5:30

दंगल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. आजही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची घौडदौड सुरूच आहे. या ...

A story like a painting movie will be seen in the series of Big Showers | ​बढो बहू या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार दंगल चित्रपटासारखी कथा

​बढो बहू या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार दंगल चित्रपटासारखी कथा

googlenewsNext
गल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. आजही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची घौडदौड सुरूच आहे. या चित्रपटातील धाकड मुलींची कथा सगळ्यांनाच भावली. आता या चित्रपटाप्रमाणेच काहीशी कथा प्रेक्षकांना बढो बहू या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 
बढो बहू या मालिकेत प्रिन्स नरूला, रिताशा राठोड प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. 100 किलोंची बढो बहू म्हणजेच रिताशा आता मालिकेत कुस्तीचे प्रशिक्षण घेताना दिसणार आहे आणि त्यासाठी तिचे सासरे तिला मदत करणार आहे. दंगल या चित्रपटात आमिर खान आपल्या मुलींमधील क्षमता ओळखून त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण देतो, त्याचप्रकारे बढो बहू या मालिकेत रघुवीर सिंग अहलवट म्हणजेच पंकज धीर आपल्या सूनेला कुस्तीत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देणार आहेत. या मालिकेत सून आणि सासऱ्यामध्ये एक खूप चांगले नाते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याविषयी पंकज धीर सांगतो, "या मालिकेची कथा ही खूपच वेगळी असल्याने ही मालिका मी स्वीकारली होती." तर या मालिकेविषयी रिताशा सांगते, "या मालिकेच्या कथानकाला आता एक वेगळे वळण मिळणार आहे. प्रेक्षकांना मालिकेतील हा ट्विस्ट नक्कीच आवडेल. या मालिकेत कुस्ती खेळताना माझा गेटअप खूप वेगळा असणार आहे. प्रेक्षकांना माझा हा गेटअप आवडेल याची मला खात्री आहे."
प्रिन्स नरुला या मालिकेत पुरस्कारविजेत कुस्तीपट्टू दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रिन्सने या मालिकेसाठी कुस्तीतील डावपेच शिकले आहेत. कुस्तीतील डावपेच आणि फिटनेस टिप्स रिताशासोबत शेअर करायला मला आवडतील असे तो सांगतो. 

Web Title: A story like a painting movie will be seen in the series of Big Showers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.