असीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 09:13 AM2018-04-23T09:13:33+5:302018-04-23T14:43:33+5:30
एक यशस्वी डॉक्टर बनून मोबाईल हॉस्पिटल चालू करण्याचे स्वप्न पाहणारी डॉ.अंजलीने अल्पावधीतच रसिकांच्या मनाचा ताबा मिळवला आहे.तिचा महत्वाकांक्षीपणा आणि ...
ए यशस्वी डॉक्टर बनून मोबाईल हॉस्पिटल चालू करण्याचे स्वप्न पाहणारी डॉ.अंजलीने अल्पावधीतच रसिकांच्या मनाचा ताबा मिळवला आहे.तिचा महत्वाकांक्षीपणा आणि प्रत्येक परिस्थितीला निडरपणे सामना करण्याची वृत्ती प्रेक्षकांना भावली आणि अल्पावधीतच मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले.सध्यामालिकेमध्ये एक अनोखा ट्विस्ट प्रेक्षक पाहत आहेत.डॉ. असीम आणि डॉ.अंजलीचा साखरपुडा झाला आणि डॉ. यशने त्या दोघांना एक मोबाल हॉस्पिटल भेट केले. त्यानंतर डॉ. असीम बेपत्ता होतो आणि त्याचा आरोप मात्र डॉ. यशवर येतो. डॉ. यशचे अंजलीवर असलेले एकतर्फीप्रेम लक्षात घेता पोलिसांनादेखील डॉ. यशवर संशय येतो आणि त्यामुळे असिमच्या बेपत्ता होण्यामागे त्याचा हात असावा अशी शंका घेतली जात आहे. यश अंजलीला समजा वण्याचा प्रयत्न करतो की यात त्याचा काही हात नाही पणकोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.यशच्या प्रेमात पडलेली रोहिणी मात्र एकच व्यक्ती आहे जी त्याच्या बाजूने उभी राहते.यश त्याचं प्रेम मिळवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही असा विश्वास देखील रोहिणी डॉ.यशवर दाखवते.
या मालिकेतून घराघरात पोहोचलेली डॉ. अंजली म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सुरुची अडारकर जशी छोट्या पडद्यावरील या मालिकेत पेशंट्सची काळजी घेते, तशीच ती खऱ्या आयुष्यात देखील माणसांची आणि पशुपक्षांची काळजी घेते. उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यांची उन्हाने लाही लाही होत असताना पशु-पक्षांना होणाऱ्या त्रासाकडे मात्र आपण फारसे लक्ष देत नाही. पाणी जे जीवन आहे असं आपण म्हणतो ते अगदी खरं आहे आणि या रखरखत्या उन्हात अनेक पक्षी पाण्याविना मरतात. पण अनेक लोक या पशु-पक्षांची काळजी घेण्यासाठी पुढे सरसावतात आणि त्यात कलाकारांचा देखील तितकाच सहभाग असतो. सुरुची आडारकर देखील तिच्या चाहत्यांना या पक्षांसाठी घराच्या खिडकीत, बाल्कनीत किंवा गच्चीवर पाणी ठेवण्याचे आवाहन करत आहे. हे आवाहन सुरुचीने तिच्या सोशल मीडियाद्वारे केले आहे आणि त्याच सोबत तिच्या फॉलोवर्सकडे याही पेक्षा काही उत्तम उपाय असतील तर त्याबद्दल विचारले आहेत. छोट्या पडद्यावरील तिच्या डॉ. अंजली या व्यक्तिरेखेप्रमाणेच सुरुची या मुक्या पक्षांच्या काळजीपोटी सर्वांना मदतीचा हात पुढे करण्याची विनंती करतेय हे उल्लेखनीय आहे.