शूटिंगवेळी सुदेश बेरीच्या डोळ्यात तरळले अश्रू, हे होते कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 18:09 IST2019-02-25T18:06:58+5:302019-02-25T18:09:00+5:30
रुपेरी पडद्यावरील एक लोकप्रिय आणि गुणी अभिनेता सुदेश बेरीने आपल्या खलनायकी व्यक्तिरेखेने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. त्याच्या अभिनयातील नवनवे पैलू पाहून मालिकेचे कर्मचारी आणि कलाकार नेहमीच चकित होत असतात.

शूटिंगवेळी सुदेश बेरीच्या डोळ्यात तरळले अश्रू, हे होते कारण
दर आठवड्याला कथानकाला मिळणार््या नव्या वळणामुळे ‘स्टार भारत’वरील ‘मुस्कान’ मालिकेने प्रेक्षकांमधील उत्सुकता कायम राखली आहे. रुपेरी पडद्यावरील एक लोकप्रिय आणि गुणी अभिनेता सुदेश बेरीने आपल्या खलनायकी व्यक्तिरेखेने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. त्याच्या अभिनयातील नवनवे पैलू पाहून मालिकेचे कर्मचारी आणि कलाकार नेहमीच चकित होत असतात.
नुकतेच एका गोळीबाराच्या प्रसंगात सुदेशने सर्व कलाकारांना आपल्या अभिनयाच्या ताकदीने अचंबित केले होते. मालिकेतील त्याच्या सरजी ही व्यक्तिरेखा आपला मुलगा रौनक मरतो, असे वाटून विलाप करतो. पण तेव्हा सुदेशने ग्लिसरिनच्या मदतीशिवाय आपल्या डोळ्यांमध्ये खरे अश्रू उभे करून सर्वांना चकित केले.
या प्रसंगाबाबत सुदेश म्हणाला, “मी आजवर इतका भावनात्मक प्रसंग साकारलेला नव्हता. माझ्यासाठी तो प्रसंग हे एक आव्हानच होतं. मी जेव्हा अभिनय करत असतो, तेव्हा मी माझ्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे तद्रूप होऊन जातो. तुम्ही आपल्या व्यक्तिरेखेशी जेव्हा मनाची तार जोडता, तेव्हा अभिनय करणं अगदी सोपं जातं. शिवाय वैयक्तिक जीवनात माझा मुलगा हे माझं सर्वस्व आहे. त्यामुळे हा प्रसंग साकारताना मी त्याचाच विचार केला आणि मग मला अश्रू उभे करण्यासाठी ग्लिसरिनची गरजच भासली नाही.” या प्रसंगाचं चित्रीकरण संपताक्षणी सुदेशने घरी फोन करून आपल्या मुलाशी गप्पा मारल्या, असे सूत्रांनी सांगितले.