लॉकडाऊनमध्ये विवाह बंधनात अडकणार सुगंधा मिश्रा, म्हणाली- लग्नाला 20 लोक येऊदेत पण मी ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 15:21 IST2021-04-20T14:40:18+5:302021-04-20T15:21:10+5:30
Sugandha mishra is going to marry in lockdown :सुगंधा आणि संकेत यांची मैत्री अतिशय जुनी आहे.

लॉकडाऊनमध्ये विवाह बंधनात अडकणार सुगंधा मिश्रा, म्हणाली- लग्नाला 20 लोक येऊदेत पण मी ...
कॉमेडियन, टेलिव्हिजन होस्ट आणि पार्श्वगायिका सुगंधा मिश्रा 26 एप्रिलला 'द कपिल शर्मा' शोची सह-कलाकार संकेत भोसलेशी विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांचे लग्न लुधियानामधील एका खासगी सोहळ्यात होणार आहे. डिसेंबरपासून त्यांच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर लग्नाची घोषणा केली आणि संकेतसोबते फोटोही शेअर केले, ज्यात तिने साटनचा गाउन घातला आहे, तर संकेत जीन्स आणि ब्लेझरमध्ये दिसतो आहे.
इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार, सुगंधाने सांगितले की तिने आपल्या लग्नातील बहुतेक खरेदी ऑनलाईन केली आहे. सुगंधा म्हणाली, मी डिसेंबरपासून माझ्या लग्नाच्या तयारी सुरू केली यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मी माझ्या लग्नाच्या ड्रेसबद्दल खूप उत्साही आहे कारण लग्न फक्त 20 लोकांच्या उपस्थितीत होते आहे याने मला फारसा फरक पडणार नाही , पण मला नेहमी 10 किलोचे लेहेंगा घालायचा आहे.
सुगंधा आणि संकेत यांची मैत्री अतिशय जुनी आहे. संकेतला द कपिल शर्मा शोमध्येदेखील सुगंधानेच आणले होते. तो या कार्यक्रमात केवळ काहीच भाग झळकला होता. त्याची मिमिक्री लोकांना खूपच आवडली होती.
सुगंधा मिश्राने गेल्या काही वर्षांत एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. गानसमाज्ञी लता मंगेशकर यांची मिमिक्री तर ती खूपच छान करते. या मिमिक्रीसाठी तिला लता मंगेशकर यांच्याकडून देखील दाद मिळाली आहे. ती द कपिल शर्मा शो मध्ये देखील झळकली आहे. डॉ. संकेत भोसले हा प्रसिद्ध कॉमेडियन असून संजय दत्तची मिमिक्री तो खूप चांगल्याप्रकारे करतो. तो व्यवसायाने डॉक्टर आहे.