'सुख म्हणजे...' फेम अभिनेत्याने पत्नीसह साजरी केली करवा चौथ, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 10:43 AM2024-10-21T10:43:57+5:302024-10-21T10:44:28+5:30

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्यानेही पत्नीसह करवा चौथचा सण साजरा केला आहे. 

sukh mhanje nakki kay asat fame actor kapil honrao celebrate karwa chauth with wife | 'सुख म्हणजे...' फेम अभिनेत्याने पत्नीसह साजरी केली करवा चौथ, शेअर केले फोटो

'सुख म्हणजे...' फेम अभिनेत्याने पत्नीसह साजरी केली करवा चौथ, शेअर केले फोटो

काल सर्वत्र करवा चौथचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. पतीला दिर्घआयुष्य मिळावे म्हणून स्त्रिया करवा चौथचं व्रत करतात. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. अनेक बॉलिवूड अभिनेत्री दिवसभर उपास करतात आणि रात्री चंद्राचं दर्शन घेऊन पतीच्या हाताने पाणी पिऊन उपवास सोडतात. यंदा सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेत्यानेही पत्नीसह करवा चौथचा सण साजरा केला आहे. 

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका. या मालिकेतील जयदीप-गौरी या जोडीप्रमाणेच इतर भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत मल्हार शिर्के पाटील ही भूमिका साकारून अभिनेता कपिल होनराव घराघरात पोहोचला. कपिलने त्याच्या पत्नीसह करवा चौथचा सण साजरा केला. याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 


कपिलने अनेक मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेनंतर कपिलने 'निवेदिता माझी ताई' मध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. 'जय जय शनिदेव' या मालिकेत तो राजा विक्रमादित्यच्या भूमिकेत दिसला होता. कपिल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून तो करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांना देत असतो. 

Web Title: sukh mhanje nakki kay asat fame actor kapil honrao celebrate karwa chauth with wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.