मराठी अभिनेत्रीचे फिटनेस Goal! चाहत्यांना देतेय योगाचे धडे, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 13:35 IST2025-01-05T13:35:01+5:302025-01-05T13:35:28+5:30
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन योगा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री Cat-Cow Pose करताना दिसत आहे.

मराठी अभिनेत्रीचे फिटनेस Goal! चाहत्यांना देतेय योगाचे धडे, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल
कलाकार आणि सेलिब्रिटी त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. फिट राहण्यासाठी कलाकार योगा, व्यायाम आणि विशेष डाएटही फॉलो करतात. अनेकदा कलाकार चाहत्यांबरोबर त्यांची फिटनेस जर्नी शेअर करताना दिसतात. व्यायाम आणि योगा करतानाचे व्हिडिओही सेलिब्रिटी शेअर करतात. आता एका मराठी अभिनेत्रीच्या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन योगा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री Cat-Cow Pose करताना दिसत आहे. त्यानंतर ती मार्जरासन करत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचा फिटनेस पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. ही अभिनेत्री म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम माधवी निमकर आहे.
माधवी नेहमीच तिचे योगा करतानाचे व्हिडिओ शेअर करत असते. आतादेखील तिने हा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना योगाचं महत्त्व पटवून दिलं आहे. माधवीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
माधवीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'स्वप्नांच्या पलिकडले', 'हम तो तेरे आशिक है', 'धावा धाव' अशा मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली. 'शेर शिवराज', 'पावनखिंड' या सिनेमांमध्येही ती दिसली होती.