'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील शालिनीची बहिण आहे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 07:00 AM2021-06-04T07:00:00+5:302021-06-04T07:00:00+5:30

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील शालिनीची भूमिका अभिनेत्री माधवी निमकरने साकारली आहे.

Sukh Mhanje Nakki Kay Asat Serial Fame Shalini aka Madhavi Nimkar sister also famous actress | 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील शालिनीची बहिण आहे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील शालिनीची बहिण आहे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात आपली छाप उमटविली आहे. या मालिकेत शालिनीची भूमिका अभिनेत्री माधवी निमकरने साकारली आहे. फार कमी लोकांना माहित आहे की मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे ही माधवी निमकरची मावस बहिण आहे. 

शालिनी उर्फ अभिनेत्री माधवी निमकर १७ मे १९८२ रोजी खोपोली ,रायगड जिल्ह्यात जन्म झाला. माधवी अभिनय क्षेत्रात तिची मावस बहिण सोनाली खरेमुळे आली. कारण सोनालीच्या शूटिंगवेळी माधवीदेखील तिच्यासोबत शूटिंगला जायची. इथूनच तिच्यात अभिनयाची आवड निर्माण झाली.

२००९ साली ‘बायकोच्या नकळत’ या चित्रपटातून माधवीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर असा मी तसा मी या चित्रपटात ती झळकली. त्यानंतर नवरा माझा भवरा, सगळं करून भागलं, धावा धाव, संघर्ष अशा चित्रपटातून ती विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. सध्या तिने शालिनीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. 


सोनाली खरेच्या कामाबद्दल सांगायचे तर तिने सावरखेड एक गाव, हृदयांतर, स्माईल प्लिज, वेलडन बेबी,तेरे लिये, चेकमेट सारख्या चित्रपटात काम केले आहे.

तिने हिंदी चित्रपटसृष्टीतला अभिनेता बिजय आनंद याच्याशी लग्न केले. अभिनेता बिजय आनंद लोकप्रिय अभिनेता आहे. आजही तो मालिकेत काम करताना दिसतो.

Web Title: Sukh Mhanje Nakki Kay Asat Serial Fame Shalini aka Madhavi Nimkar sister also famous actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.