'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील देवकीनं शेअर केली लेकीची झलक, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 01:30 PM2022-05-26T13:30:33+5:302022-05-26T13:31:05+5:30
Sukh Mhanje Nakki Kay Asata Fame Meenakshi Rathod:'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोडला नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेनं आणि त्यातील सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत देवकीच्या भूमिकेतून अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) घराघरात पोहचली आहे. नुकतेच तिला कन्यारत्न प्राप्त झाला आहे. त्यामुळे ती सध्या प्रसुती रजेवर आहे. या मालिकेत तिच्याजागी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी पाहायला मिळते आहे. दरम्यान मीनाक्षीने नुकताच लेकीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
मीनाक्षी राठोड हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिचा नवरा कैलास वाघमारे लेकीला खेळवताना दिसतो आहे. या व्हिडीओत बाळाची झलक देखील पाहायला मिळत आहे. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, जीतनी तू मीलती जाये उतनी लगे थोडी थोडी….लेकीसाठी नाव सुचवा.
मीनाक्षी राठोडच्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काही चाहत्यांनी तिला लेकीसाठी नावदेखील सुचवले आहे.
काही दिवसांपूर्वी मीनाक्षीने बाळाच्या हाताचा फोटो शेअर केला होता आणि लिहिले होते की, सगळयांनी किती प्रेमाने माझं स्वागत केलेय ! नक्कीच हे जग खूप प्रेमळ असावं! थँक्यू.
मीनाक्षी राठोडने सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेव्यतिरिक्त ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत मीनाक्षीने पंचबाईंची भूमिका साकारली होती. मालिकाच नाहीतर सिनेमातही ती झळकली आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ सिनेमातही ती झळकली आहे. मीनाक्षीने आणि कैलास दोघांनीही एकत्र काही नाटकातही काम केले आहे. कैलास तान्हाजी या हिंदी चित्रपटात झळकला आहे. या सिनेमा आधी शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर मोहल्ला’ या गाजलेल्या नाटकात त्याने कट्टर मावळ्याची भूमिका निभावली होती.