'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील देवकी बोल्ड फोटोंमुळे झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 14:12 IST2022-05-02T14:11:49+5:302022-05-02T14:12:19+5:30
Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत देवकी म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) लवकरच आई होणार आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील देवकी बोल्ड फोटोंमुळे झाली ट्रोल
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं(Sukh Mhanje Nakki Kay Asata)ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता मालिकेतील या अभिनेत्रीने मालिका सोडली आहे. त्याला कारणही तसे खास आहे. ही अभिनेत्री म्हणजे देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod). ती लवकरच खऱ्या आयुष्यात आई होणार आहे. तिने नुकतेच बेबी बंपमध्ये फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोंचे काहींनी कौतुक केलं तर काहींनी तिला ट्रोल केले आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत देवकी म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोड गर्भवती असताना देखील काम करते आहे. यासाठी तिचे खूप कौतुक झाले होते. दरम्यान मीनाक्षीने नुकतेच बेबी बंपसोबत फोटोशूट केले. यात तिने तिचा बेबी बंप दाखवला. तिच्या या बोल्ड फोटोशूटमुळे तिचे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. काही चाहत्यांची तिच्या या फोटोशूटची प्रशंसा केली तर काहींनी तिला ट्रोल केले.
एका युजरने म्हटले की, खरंच तू मॅड आहेस, असे आपले अंग प्रदर्शन कुणालाही दाखवू नये. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, आपण घेतलेले कष्ट लोकांसमोर अशा अवतारात मांडणे हे अतिशय दुर्दैवी आहे.
मीनाक्षी राठोडच्या पतीचे नाव कैलास वाघमारे असून त्याने देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. कैलास अजय देवगणच्या ‘तानाजी द अनसंग वारियर’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे सर्वत्र खूप कौतुक झाले होते. मीनाक्षी आणि कैलास हे एकाच चित्रपटात देखील दिसणार असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटाची निर्मिती कैलास वाघमारे हा करतो आहे.