'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम देवकी उर्फ मिनाक्षी राठोडचं आई झाल्यानंतरच पहिलं फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 12:19 PM2022-07-06T12:19:56+5:302022-07-06T12:20:44+5:30
Sukh Mhanje Nakki Kay Asata: सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिका मागच्या आठवड्यातील टीआरपीच्या शर्यतीत अव्वल ठरली आहे. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. तसेच या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत देवकीच्या भूमिकेतून मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) घराघरात पोहचली. मात्र सध्या या मालिकेत तिच्या जागी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी पाहायला मिळत आहे. मीनाक्षी राठोडला नुकताच कन्यारत्न प्राप्त झाला आहे. त्यामुळे सध्या ती रजेवर आहे. दरम्यान, आई झाल्यानंतरचे तिचे पहिले फोटोशूट समोर आले आहे.
अभिनेत्री मीनाक्षी राठोड सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांंना अपडेट देत असते. बऱ्याचदा ती फोटोदेखील शेअर करते. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. दरम्यान आता आई झाल्यानंतर तिने पहिल्यांदा तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती काळ्या आणि लाल रंगाची बॉर्डर असलेल्या साडीत दिसते आहे. या साडीतील दोन फोटो शेअर करत तिने लिहिले की, तयारी. तिच्या या फोटोवर चाहते कमेंट्स करत आहेत. तिचे चाहते तिला मालिकेत परत ये असे कमेंट्समध्ये सांगताना दिसत आहेत.
२०१८ मध्ये मराठी मालिका ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मधून मीनाक्षी राठोडने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. २०२० मध्ये तिला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका मिळाली. मीनाक्षीने अनेक लघुपटांमध्ये काम केले आहे.