'सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम जयदीपची पत्नी आहे लोकप्रिय हिंदी अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 05:49 PM2022-03-16T17:49:42+5:302022-03-16T17:50:20+5:30

Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत जयदीपची भूमिका अभिनेता मंदार जाधव (Mandar Jadhav)ने साकारली आहे. मंदारची पत्नी देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

'Sukh Mhanje Nakki Kay Asata' Fame Jaydeep's wife is a popular Hindi actress, find out about her | 'सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम जयदीपची पत्नी आहे लोकप्रिय हिंदी अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

'सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम जयदीपची पत्नी आहे लोकप्रिय हिंदी अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेतील गौरी आणि जयदीपची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते. मात्र तुम्हाला जयदीपच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीबद्दल माहित आहे. तीदेखील हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चला तर मग तिच्याबद्दल जाणून घेऊयात. 

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जयदीपची भूमिका अभिनेता मंदार जाधव(Mandar Jadhav)ने साकारली आहे. मंदारची पत्नी देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मंदारच्या पत्नीचे नाव मितिका शर्मा जाधव (Mitika Sharma Jadhav) असे असून तीदेखील मंदारप्रमाणेच उत्तम अभिनेत्री आहे. शिवाय ती गौरी इतकीच सुंदर देखील आहे. तिने देवो के देव महादेव या हिंदी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती.

मंदार जाधवने देखील हिंदी मालिकेत काम केले आहे. ही मालिका म्हणजे अल्लादीन. २०१६ साली मंदार आणि मितिकाने लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुले असून त्यांचे नाव रिदान आणि रेहान असे आहे. मितिका सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मंदार आणि मितिकाच्या फोटोंनादेखील चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 


सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे. जयदीपने गौरीला कड्यावरून ढकलून दिल्यानंतर तिने या जगाचा निरोप घेतला असे सर्वांना वाटत असते. मात्र आता गौरी सारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झाली आहे. ती गौरीसारखी दिसत असली तरी तिचा अंदाज मात्र वेगळाच आहे. गौरी साधीभोळी असली तरी ही पाहुणी मात्र अरे ला कारे करणारी आहे. आता ही गौरी तिच्या जीवावर उठलेल्या प्रत्येकाला पळता भुई थोडं करताना दिसत आहे.

Web Title: 'Sukh Mhanje Nakki Kay Asata' Fame Jaydeep's wife is a popular Hindi actress, find out about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.