‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेचं थेट ‘बाजीगर’ कनेक्शन...; वाचा, जयदीपची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 03:15 PM2022-02-28T15:15:31+5:302022-02-28T15:17:52+5:30

Sukh Mhanje Nakki Kay Asata: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे काय असतं’ ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. आता तर ही मालिका एका अनपेक्षित वळणावर येऊन पोहोचली आहे.

Sukh Mhanje Nakki Kay Asata fame mandar jadhav share post baazigar connection | ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेचं थेट ‘बाजीगर’ कनेक्शन...; वाचा, जयदीपची पोस्ट

‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेचं थेट ‘बाजीगर’ कनेक्शन...; वाचा, जयदीपची पोस्ट

googlenewsNext

स्टार प्रवाहवरील  (Star Pravah) लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asata) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. आता तर ही मालिका एका अनपेक्षित वळणावर येऊन पोहोचली आहे. होय, नुकत्याच प्रसारित भागात गौरीवर जीवापाड प्रेम करणारा जयदीप तिलाच कड्यावरून ढकलून देताना दिसला.
मालिकेतील हा सीन पाहून तुम्हाला एका सिनेमाचा सीन आठवतोय का?  आठवत नसेल तर जयदीप अर्थात ही भूमिका साकारणारा अभिनेता मंदार जाधवची (Mandar Jadhav) पोस्ट तुम्हाला हिंट देऊ शकते. होय, मंदारने एक पोस्ट शेअर केली आहे.

यात त्याने मालिकेच्या सेटवरचा एक फोटो पोस्ट करत, त्याला ‘बाजीगर मैं बाजीगर, दिलवालों का मैं दिलबर...,’ असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनवरून तुम्हाला हिंट मिळाली असेलच. तर या चित्रपटाचं नाव आहे बाजीगर.

बाजीगर कनेक्शन...
‘बाजीगर’ या सिनेमाचं आणि ‘सुख म्हणजे काय असतं’ या मालिकेचं काय कनेक्शन आहे? असा प्रश्न तुम्हाला आता पडला असेल तर आहे. गौरी आई  होणार हे समजल्यानंतर जयदीप तिला कड्यावरून खाली ढकलून देतो आणि मानसीचा हात पकडतो. ‘बाजीगर’मध्ये सेम असाच एक सीन आहे.   चित्रपटात शाहरुख काजोलसाठी शिल्पा शेट्टीला अशाचप्रकारे बिल्डिंगवरून खाली ढकलतो. बाजीगरचा हा सीन आणि ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेतील दृश्यातील हेच साम्य मंदारने त्याच्या पोस्टमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

तूर्तास ‘सुख म्हणजे काय असतं’मधील जयदीपचं हे नवं रूप पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांना तर मालिकेतील हा अनपेक्षित ट्विस्ट जराही आवडलेला नाही. अनेकांनी त्यावर टीका केली आहे. आम्हाला हे पटलंच नाही, चांगल्या मालिकेची अशी वाट लावू नका प्लीज, अशा प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिल्या आहेत.  

Web Title: Sukh Mhanje Nakki Kay Asata fame mandar jadhav share post baazigar connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.