सुख म्हणजे नक्की काय असतं: गौरी होणार आई; शिर्के-पाटलांच्या घरात घुमणार बाळाचा आवाज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 06:46 PM2022-02-01T18:46:23+5:302022-02-01T18:46:56+5:30

Sukh mhanje nakki kay asata: सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये गौरी आई होणार असून शिर्के-पाटलांच्या वाड्यात आता आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

sukh mhanje nakki kay asata Gauri will be a mother | सुख म्हणजे नक्की काय असतं: गौरी होणार आई; शिर्के-पाटलांच्या घरात घुमणार बाळाचा आवाज

सुख म्हणजे नक्की काय असतं: गौरी होणार आई; शिर्के-पाटलांच्या घरात घुमणार बाळाचा आवाज

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील जयदीप आणि गौरीची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवड असून या दोघांच्या संसारात कोणत्या घडामोडी घडतात हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. त्यातच काही दिवसांपूर्वी गौरी आयुष्यात मोठं वादळ येतं. गौरी कधीच आई होणार नाही असं जोगतीण सांगते. या भविष्यवाणीनंतर घरातील प्रत्येकाचं गौरीसोबतचं वागणं बदलतं. मात्र, यामध्येच आता गौरी आई होणार असल्याची गोड बातमी समोर येते. 

अलिकडेच गौरी आणि शालिनी, माईंसोबत अंबाबाईकडे कौल लावायला जातात. यावेळी जोगतीण सांगते की, जिच्या वाटीत जितकी फुले पडतील तिला तितकी मुले देवी फळ म्हणून देणार. परंतु, गौरीच्या वाटीत एकही फूल पडत नाही. त्यामुळे माई प्रचंड संतापतात आणि गौरीसोबत बोलणं सोडून देतात. एकीकडे आई होणार नसल्याचं दु:ख आणि दुसरीकडे माईंचं बदलेलं वागणं यामुळे गौरी पार गांजून गेली असते. मात्र, आता तिच्या आयुष्यात आनंद पसरला आहे. जोगतीणीची भविष्यवाणी खोटी ठरणार असून गौरी आई होणार आहे. 

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये गौरी आई होणार असून शिर्के-पाटलांच्या वाड्यात आता आनंदाचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे आता या मालिकेत पुढे काय घडणार? गौरी खरंच आई होणार का? माईंचं वागणं बदलणार का? असे असंख्य प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.
 

Web Title: sukh mhanje nakki kay asata Gauri will be a mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.