'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेता झाला बाबा, होळीच्या दिवशी घरी आला नवा पाहुणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 13:23 IST2024-03-25T13:22:34+5:302024-03-25T13:23:37+5:30
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील प्रसिद्ध अभिनेता बाबा झालाय. होळीच्या खास दिवशी अभिनेत्याच्या आयुष्यात चिमुकल्या पावलांचं आगमन झालंय. मुलगा की मुलगी? वाचा सविस्तर

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेता झाला बाबा, होळीच्या दिवशी घरी आला नवा पाहुणा
स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका सर्वांना आठवत असेलच. गेली ३ हून अधिक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी प्रेम केलंय. या मालिकेत उदयची भूमिका साकारणारा अभिनेता बाबा झालाय. उदयची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता संजय पाटीलच्या घरी नवा पाहुणा आलाय.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील उदय अर्थात संजयला मुलगी झाली आहे. संजयने सोशल मीडियावर चिमुकल्या लेकीचा खास फोटो शेअर करत पोस्ट लिहीलीय की, "काल होळी पौर्णिमा साजरी झाली.. आमच्या आयुष्यात साजिरी गोजिरी परी आली... Its a Baby Girl" असं कॅप्शन देत संजयने छोट्या लेकीच्या जन्माबद्दल आनंद साजरा केलाय.
संजय आणि त्याची बायको अबोलीला मुलगी झालीय. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील गिरीजा प्रभू, मिनाक्षी राठोड अशा कलाकारांनी संजयचं अभिनंदन केलंय. संजय हा प्रसिद्ध अभिनेता आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. संजयची बायको अबोली एक लोकप्रिय लेखिका आहे. अबोलीने काही दिवसांपुर्वी संजयसोबत डोहाळेजेवणाचं खास फोटोशूट केलं होतं. आता दोघांना मुलगी झाल्याने दोघेही आनंदात असतील, यात शंका नाही.