कोण म्हणतं सेलिब्रिटींना स्वयंपाक येत नाही?; माधवी निमकरने केली टम्म फुगलेली पुरणपोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 08:03 PM2023-03-24T20:03:39+5:302023-03-24T20:04:25+5:30

Madhavi nimkar: घरात कितीही कामाला माणसं असली तरीदेखील हे कलाकार त्यांच्या घरात सर्वसामान्यांप्रमाणेच सगळी काम करतात. 

sukh mhanje nakki kay asta fame madhavi nimkar puran poli making video | कोण म्हणतं सेलिब्रिटींना स्वयंपाक येत नाही?; माधवी निमकरने केली टम्म फुगलेली पुरणपोळी

कोण म्हणतं सेलिब्रिटींना स्वयंपाक येत नाही?; माधवी निमकरने केली टम्म फुगलेली पुरणपोळी

googlenewsNext

कलाविश्वातील सेलिब्रिटींचं आयुष्य नेमकं कसं असतं हे जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. त्यामुळे बऱ्याचदा हे चाहते त्यांना सोशल मीडियावर फॉलो करुन त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे ही कलाकार मंडळीदेखील त्यांच्या विषयीचे अपडेट वरचेवर शेअर करत असतात. यात सध्या अभिनेत्री माधवी निमकरचा (madhavi nimkar)एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माधवीने मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी केली आहे.

स्टारडम उपभोगणाऱ्या कलाकारांचं आयुष्य ऐशोआरामाचं असतं असं साऱ्यांनाच वाटतं. या कलाकारांच्या घरी त्यांच्या दिमतीला हजारो नोकरचाकर असतील. त्यामुळे त्यांना घरात काम करायची गरज नसेल असं अनेकांना वाटतं. मात्र, काही कलाकार याला अपवाद आहेत. घरात कितीही कामाला माणसं असली तरीदेखील हे कलाकार त्यांच्या घरात सर्वसामान्यांप्रमाणेच सगळी काम करतात. 

सोशल मीडियावर सध्या माधवी निमकरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून ती पुरणपोळी करत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे माधवीने सुरेखरित्या ही पुरणपोळी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचं कौतुक होत आहे.

दरम्यान, पाडव्याच्या निमित्ताने माधवीने ही पुरणाची पोळी केली होती. माधवी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून सध्या ती 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (sukh mhanje nakki kay asta) या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिने साकारलेली शालिनी या खलनायिकी भूमिकेला विशेष पसंती मिळत आहे.
 

Web Title: sukh mhanje nakki kay asta fame madhavi nimkar puran poli making video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.