'सुख म्हणजे नक्की काय असतं' कठीण काळात गौरीला मिळणार जयदीपची खंबीर साथ, मानसी-अनिलचा होणार पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 12:52 PM2022-06-09T12:52:57+5:302022-06-09T13:03:36+5:30

Sukh Mhanje Nakki Kay Asta : कठीण काळात गौरीला जयदीपची खंबीर साथ मिळणार आहे. आता ते दोघे मिळून मानसी आणि अनिलचा पर्दाफाश करणार आहेत.

Sukh Mhanje Nakki Kay Asta Gauri will get Jaydeep's strong support in difficult times, Mansi-Anil will be exposed | 'सुख म्हणजे नक्की काय असतं' कठीण काळात गौरीला मिळणार जयदीपची खंबीर साथ, मानसी-अनिलचा होणार पर्दाफाश

'सुख म्हणजे नक्की काय असतं' कठीण काळात गौरीला मिळणार जयदीपची खंबीर साथ, मानसी-अनिलचा होणार पर्दाफाश

googlenewsNext

छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं(sukh mhanje nakki kay asta). ही मालिका पहिल्या भागापासून लोकप्रिय झाली आणि आता तर टीआरपीच्या शर्यतीमध्येही यशस्वी घोडदौड करत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या गौरी आणि जयदीप यांच्या नात्यात अनेक चढउतार येत आहेत. सध्या गौरी तुरुंगात आहे. या कठीण काळात गौरीच्या पाठीमागे पुन्हा एकदा जयदीप खंबीरपणे उभा राहणार आहे. 

याआधी गौरीच्या हत्येचा प्रयत्न खऱ्या जयदीपने केला नसून तो अनिल असतो हे सत्य तिला समजलंय. नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला आहे. यात जयदीप गौरीला भेटण्यासाठी आलेला दिसतोय. ऐवढंच नाही तर तो गौरीला आपण मानसी आणि याअनिलला शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे सांगतोय. 

जयदीपला पोलिस स्टेशनमध्ये सुरुवातीला गौरीला भेटण्यासाठी पोलिस नकार देतात. पण तो आदळाआपट करुन गौरीला भेटतो. गीता त्याला आपणच गौरी असल्याची खात्री जयदीपला पटली ना असं विचारताना दिसतेय. जयदीप तिला आपण गप्प बसणार नाही. त्या लोकांनी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय असं सांगतो. कठीण काळात गौरीला जयदीपची साथ मिळणार आहे. गौरी आणि जयदीप दोघे पुन्हा एकत्र येणार. आता ते दोघे मिळून मानसी आणि अनिलचा कसा पर्दाफाश करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
 

Web Title: Sukh Mhanje Nakki Kay Asta Gauri will get Jaydeep's strong support in difficult times, Mansi-Anil will be exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.