"त्यांनी हातमाग व्यवसायासाठी आपलं सर्वस्व दिलंय, त्यांना थोडं...",सुखदा खांडकेकरने लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 08:00 PM2023-08-07T20:00:10+5:302023-08-07T20:13:47+5:30

आजचा दिवस हातमाग दिवस म्हणून ओळखला जातो. सुखदाने याच निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

sukhada khandkekar share a special post for handloom worker | "त्यांनी हातमाग व्यवसायासाठी आपलं सर्वस्व दिलंय, त्यांना थोडं...",सुखदा खांडकेकरने लिहिली खास पोस्ट

"त्यांनी हातमाग व्यवसायासाठी आपलं सर्वस्व दिलंय, त्यांना थोडं...",सुखदा खांडकेकरने लिहिली खास पोस्ट

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर. अभिजीत आणि सुखदा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी असून दोघांनीही कलाविश्वात त्यांचं स्थान निर्माण केलं आहे. अभिजीत आणि सुखदा सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत त्यामुळे अनेकदा ते चाहत्यांसोबत त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टी शेअर करत असतात.

बऱ्याचदा साडीत वावरणाऱ्या सुखदाने विणकर आणि हातमागावर काम करणाऱ्या कामगारांसाठी खास पोस्ट लिहिली आहे हातमाग उद्योग हा भारताच्या उत्तूंग सांस्कृतिक वारशाचं प्रतिनिधित्व करणारा उद्योग म्हणून ओळखला जातो. कित्येक यंत्रे आली पण अजूनही हातमाग उद्योग त्याचं वैभव टिकवून आहे.आजचा  दिवस हातमाग दिवस म्हणून ओळखला जातो. सुखदाने याच निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. 


सुखदाची पोस्ट 
''चला आपल्या विणकर आणि हातमाग कामगारांसाठी उज्वल भविष्य घडवूया! या विशेष दिवशी, आपल्या जादुई निर्मितीद्वारे आपल्या परंपरा जिवंत ठेवणाऱ्यांची उत्कृष्ट कलाकुसर आणि समर्पण साजरे करूया. आज, आपल्या विणकरांना आणि त्यांनी ज्या हातमाग व्यवसायात आपले सर्वस्व ओतले आहे त्यांना थोडे अधिक प्रेम आणि लक्ष देण्याची शपथ घेऊया. त्यांना पाठिंबा देऊन, आपला समृद्ध वारसा जतन करुया.'' सुखदाच्या या पोस्टवर पती अभिजीतने देखील हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. तिच्या चाहत्यांनी ही या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. 

सुखदा तिच्या अभिनयापेक्षाही सौंदर्यामुळे जास्त चर्चेत येत असते. त्यामुळे सोशल मीडियावरही तिचा तगडा चाहतावर्ग असल्याचं दिसून येतो. सुखदादेखील या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम प्रयत्न करत असते. सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. तिने अहिल्याबाई होळकर या मालिकेत द्वारकाबाईची भूमिका साकारली आहे. सुखदाने धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.
 

Web Title: sukhada khandkekar share a special post for handloom worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.