सुमेध मुदगलकर राधाकृष्णसाठी वाजवणार बासरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 06:00 IST2018-09-19T16:39:25+5:302018-09-20T06:00:00+5:30
त्याच्याकडे सेटवरही बासरी असते आणि तो ब्रेकदरम्यान सराव करत राहतो. त्याचा विश्वास आहे की त्यामुळे ध्यान करण्यास आणि त्याच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करण्यास त्याला मदत होते.

सुमेध मुदगलकर राधाकृष्णसाठी वाजवणार बासरी
कलाकार मंडळी अभिनयासह इतर गोष्टींमध्येही तितकेच पारंगत असतात. वैयक्तिक आयुष्यात अभिनयासह निरनिराळ्या गोष्टी करणं कलाकारांना आवडतं. शुटिंगच्या रोजच्या बिझी शेड्युअलमध्ये स्वतःसाठी वेळ घालवत कलाकार त्या क्षणाचा आनंद घेत असतात. प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणाला जेवण बनवणं, कुणाला गायनाचा तर कुणाला फिरण्याचा छंद असतो. त्याचप्रकारे सुमेधलाही बासरी वादनाचा छंद आहे.
आगामी मालिका राधाकृष्णमध्ये कृष्णाची भूमिका करणारा सुमेध मुदगलकर हल्ली बासरी वाजवायला शिकत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ह्या व्यक्तिरेखेची तयारी करत असलेल्या सुमेधला आता बासरी वाजवण्यात रूची निर्माण झाली आहे. भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवत असत, त्यामुळे सुमेधलासुद्धा ही कला शिकावीशी वाटली कारण त्याला त्याचा ह्या शोमध्ये उपयोगच होणार होता.
सुमेधने यासाठी अगदी प्रशिक्षण घेतले नसले तरी तो बासरीवादन ऐकत आहे आणि बासरीवादकांचा सल्ला घेत आहे. त्याच्याकडे सेटवरही बासरी असते आणि तो ब्रेकदरम्यान सराव करत राहतो. त्याचा विश्वास आहे की त्यामुळे ध्यान करण्यास आणि त्याच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करण्यास त्याला मदत होते. रोचक गोष्ट अशी आहे की अन्य कलाकार आणि तंत्रज्ञांनासुद्धा सुमेधचे बासरीवादन आवडते आणि ते त्याला अनेकदा बासरी वाजवण्याची विनंती करतात.
सुमेध ह्या वृत्ताला दुजोरा देत म्हटले, “कृष्णाची भूमिका साकारण्यासाठी माझी निवड झाली आहे हा मला मिळालेला आशिर्वाद आहे. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी केवळ कृष्णाचे गुणच अंगी बाळगत नाहीये तर अनेक नवीन गोष्टीही शिकत आहे. बासरी शिकणे ही केवळ माझी तयारी नसून माझी ध्यानधारणासुद्धा आहे. मी स्वतःचा बासरी वाजवायला शिकत आहे आणि अनेकदा सेटवर अन्य कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी बासरी वाजवतो.”