सुमोना चक्रवर्तीने सोडला ‘द कपिल शर्मा शो’? नव्या प्रोमोनं वाढवलं चाहत्यांचं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 11:56 IST2022-03-29T11:55:05+5:302022-03-29T11:56:59+5:30
The Kapil Sharma Show : गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांनी ‘द कपिल शर्मा शो’ला रामराम ठोकला. आता सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti ) हिनेही ‘द कपिल शर्मा शो’ला रामराम ठोकल्याची चर्चा आहे.

सुमोना चक्रवर्तीने सोडला ‘द कपिल शर्मा शो’? नव्या प्रोमोनं वाढवलं चाहत्यांचं टेन्शन
‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) पुन्हा एकदा चर्चेत आहे. अर्थात यावेळी कारण जरा वेगळं आहे. होय, गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांनी ‘द कपिल शर्मा शो’ला रामराम ठोकला. अली असगर, उपासना सिंह, सुनील ग्रोव्हर अशी अनेक नावं घेता येतील. आता सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti ) हिनेही ‘द कपिल शर्मा शो’ला रामराम ठोकल्याची चर्चा आहे. अद्याप सुमोना वा कपिल शर्माने याची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण एका नव्या शोचा प्रोमो पाहून सुमोनाने कपिलचा शो सोडल्याची चर्चा जोरात आहे.
चर्चा खरी मानाल तर सुमोनाने ‘द कपिल शर्मा शो’ सोडून एक नवा शो साईन केला आहे. या नव्या शोचा प्रोमोही रिलीज झाला आहे. एका बंगाली शोमध्ये सुमोना झळकणार आहे. सुमोनाने या शोचा प्रोमो तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. ZeeZestच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवरही हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यात सुमोना 22-25 वर्षांच्या मुलीची भूमिका साकारताना दिसतेय. ‘शोना बंगाल’ असं या शोचं नाव आहे. यात रेट्रो व मॉडर्न अशा दोन्ही लूकमध्ये सुमोना दिसेल.
30 मार्चपासून रात्री 8 वाजता ZeeZest याच चॅनलवर हा शो टेलिकास्ट होतोय. नवीन शो मिळाल्यानं सुमोनाने ‘द कपिल शर्मा शो’ सोडल्याचं मानलं जातंय. अर्थात सुमोना सांगत नाही, तोपर्यंत ही चर्चा समजायला हरकत नाही. पण एकाचवेळी दोन शो करणं हे तसं कठीण आहे. खास करून दोन्ही शो वेगवेगळ्या राज्यात शूट होत असतील तर ते आणखीच कठीण आहे. त्यामुळे खरं काय ते लवकर कळेलंच.