लतिकाची खवय्येगिरी! शेअर केला झणझणीत नाशिक मिसळचा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 13:54 IST2021-10-13T13:53:35+5:302021-10-13T13:54:30+5:30
Akshaya naik: अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती नाशिकच्या एका रेस्टॉरंटमध्ये असून तिथे तिने झणझणीत मिसळीचा आस्वाद घेतला आहे.

लतिकाची खवय्येगिरी! शेअर केला झणझणीत नाशिक मिसळचा Video
'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक(akshaya naik). कमी कालावधीत अक्षयाचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. या मालिकेत अक्षयाने लतिका ही भूमिका साकारली असून अभिनेता समीर परांजपेने (sameer paranjpe) तिच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली अक्षया अनेकदा सोशल मीडियावर तिचे काही भन्नाट फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यामध्ये तिने अलिकडेच नाशिकची मिसळ खाताना व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनयाप्रमाणेत अक्षयाला खवैय्येगिरीची प्रचंड आवड असून ती अस्सल फुडी असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती इन्स्टाग्रामवर कोणत्या ना कोणत्या नव्या पदार्थाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. त्यातच तिने झणझणीत नाशिक मिसळचा व्हिडीओ शेअर केला आहे.
अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती नाशिकच्या grape_embassy या रेस्टॉरंटमध्ये असून तिथे तिने झणझणीत मिसळीचा आस्वाद घेतला आहे. सोबतच तिने कॅप्शनमध्ये तिची प्रतिक्रियादेखील दिली आहे. सध्या अक्षयाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत असून तिच्या ताटातली मिसळ पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे.
दरम्यान, 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर आली आहे. अभिमन्यु पुन्हा एकदा शर्यतीत उतरला आहे. त्यामुळे दरवेळी प्रमाणे या शर्यतीतही त्याला लतिकाची साथ मिळाली आहे. परंतु, आबांना या शर्यतीची माहिती मिळाल्यावर पुन्हा एकदा ते संतापले असून यापुढे ते कोणता निर्णय घेतील हे पाहणं औत्सुक्याचं आहे.