पाहा सुंदरा मनामध्ये भरलीमधील अभिमन्यू म्हणजेच समीर पराजंपेच्या पत्नीचे फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 19:11 IST2021-06-25T19:07:43+5:302021-06-25T19:11:59+5:30
‘सुंदरा मनामध्ये भरली’चा अभिमन्यू अर्थात समीर परांजपे विवाहित आहे. त्याच्या पत्नीचे नाव आहे अनुजा.

पाहा सुंदरा मनामध्ये भरलीमधील अभिमन्यू म्हणजेच समीर पराजंपेच्या पत्नीचे फोटो
रसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने २५० भागांचा पल्ला गाठला आहे. मालिकेमधील लतिका आणि अभिमन्युची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे. या दोघांच्या सुख – दु:खात, त्यांच्या अडचणीमध्ये प्रेक्षकांनी त्यांची साथ दिली...
‘सुंदरा मनामध्ये भरली’चा अभिमन्यू अर्थात समीर परांजपे विवाहित आहे. त्याच्या पत्नीचे नाव आहे अनुजा. अनुजा ही समीरची मैत्रीण होती. मैत्री प्रेमात बदलली आणि 27 नोव्हेंबर 2016 रोजी समीर व अनुजा लग्नबेडीत अडकले. समीर अभिनेता असला तरी अनुजाचा अभिनयाशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. ती पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. अनुजासोबतचे अनेक फोटो अभिमन्यू त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर करत असतो.
नाटक, एकांकिका आणि सांस्कृतिक आवड असल्याने समीर हळूहळू कला जगताकडे वळला. हा प्रवास समीरसाठी नक्कीच सोपा नव्हता. इंजिनिअरिंग करण्यासाठी समीरने पुणे गाठले. इंजिनिअरची पदवी पूर्णही केली. मात्र कलेची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. इंजिनिअरिंग करतानाच, एकांकिका आणि नाटकांमधून स्वत:च्या आवडीचा प्रवास सुरूच होता. फिरोदिया करंडक स्पर्धेतून समीरने आपल्या अभिनयाची झलक दाखवली. अगदी सुरुवातीला समीरला राकेश सारंग यांच्या ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत छोटासा रोल मिळाला होता. ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतील एका छोट्या पात्रापासून समीरच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यानंतर गोठ, गर्जा महाराष्ट्र आणि अग्निहोत्र २ या मालिकेत त्यानं नायकाची भूमिका साकारली. भातुकली या चित्रपटातसुद्धा तो प्रमुख भूमिकेत दिसला होता.