लतिकाने जिरवला आमदाराच्या पोराचा माज; गावकऱ्यांसमोर काढाव्या लागल्या मिशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 18:30 IST2021-10-22T18:30:00+5:302021-10-22T18:30:00+5:30
Sundara manamadhe bharli: 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत दौलत आणि अभिमन्यु या दोघांमध्ये जोखड घेऊन धावण्याची शर्यत लागली होती. या शर्यतीमध्ये अभिमन्युला हरवण्यासाठी दौलत अनेक डाव रचतो.

लतिकाने जिरवला आमदाराच्या पोराचा माज; गावकऱ्यांसमोर काढाव्या लागल्या मिशा
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'सुंदरा मनामध्ये भरली'. सध्या या मालिकेत अभिमन्यु आणि लतिकाच्या आयुष्यात अनेक चढउतार येत आहेत. एकीकडे या दोघांचा घटस्फोट होणार आहे. परंतु, या दोघांच्याही मनात एकमेकांविषयी प्रचंड प्रेम आणि आदर आहे. त्यामुळे अडअडचणीला हे दोघही एकमेकांची मदत करताना दिसत आहे. यामध्येच अभिमन्यु आणि दौलतमध्ये लागलेल्या पैजेमध्ये दौलतचा पराभव होणार आहे. त्यामुळे ठरलेल्या अटीप्रमाणे दौलता गावकऱ्यांसमोर मिशा काढाव्या लागणार आहेत.
'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत दौलत आणि अभिमन्यु या दोघांमध्ये जोखड घेऊन धावण्याची शर्यत लागली होती. या शर्यतीमध्ये अभिमन्युला हरवण्यासाठी दौलत अनेक डाव रचतो. मात्र, या शर्यतीमध्ये अभिमन्युच बाजी मारतो. शर्यत जिंकण्यासाठी अवघं काही अंतर शिल्लक असताना अभिमन्युला त्रास जाणवू लागतो. ज्यामुळे लतिका त्याच्या खांद्यावरचं जोखड स्वत:च्या खांद्यावर घेऊन शर्यत जिंकते. परिणामी, अभिमन्यु आणि दौलतमध्ये लागलेल्या पैजेनुसार, सगळ्या गावकऱ्यांसमोर दौलतला त्याची मिशी काढावी लागते.
दरम्यान, लतिकाने स्पर्धा जिंकून दौलतची फजिती केल्यामुळे दौलत रागाने पेटून उठला आहे. त्यामुळेच याचा बदला तो आता अभिमन्युच्या कुटुंबासोबत घेणार आहे. या सगळ्या प्रकरणात अभिमन्युच्या आईला मारहाण होणार आहे. परंतु, हे नेमकं कसं आणि कशा पद्धतीने होते हे सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना समजणार आहे.