‘सुंदरा मनामध्ये भरली’मधून अभिलाषाची एक्झिट? अभिनेत्रीची पोस्ट वाचून चाहत्यांना पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 05:37 PM2022-07-08T17:37:30+5:302022-07-08T17:40:06+5:30

Sundara Manamadhe Bharli : होय, राधा सागरने एक पोस्ट शेअर केली आहे आणि तिची ही पोस्ट वाचून अभिलाषाचा मालिकेतील प्रवास संपणार की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Sundara Manamadhe Bharli fame Abhilasha aka Radha Sagar post | ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधून अभिलाषाची एक्झिट? अभिनेत्रीची पोस्ट वाचून चाहत्यांना पडला प्रश्न

‘सुंदरा मनामध्ये भरली’मधून अभिलाषाची एक्झिट? अभिनेत्रीची पोस्ट वाचून चाहत्यांना पडला प्रश्न

googlenewsNext

‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharli ) ही प्रेक्षकांची आवडती मालिका. लतिका आणि अभ्याच्या या कथेनं सगळ्यांना खिळवून ठेवलं. मालिकेतील सगळेच कलाकार लोकप्रिय ठरले. या मालिकेतील अभिलाषा ( Abhilasha) तुम्हाला ठाऊक असेलच. होय, मालिकेतील खलनायिका आणि अभिमन्यूची बॉस तीच ती अभिलाषा. अभिलाषाची भूमिका अभिनेत्री राधा सागरने  ( Radha Sagar) वठवली आहे आणि सध्या तिच्याबद्दल बातमी आहे. होय, राधा सागरने एक पोस्ट शेअर केली आहे आणि तिची ही पोस्ट वाचून अभिलाषाचा मालिकेतील प्रवास संपणार की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

राधाने ‘अभिलाषा’ या तिच्या भूमिकेबद्दल भरभरून लिहिलं आहे. तिने लिहिलं, ‘गेल्या काही दिवसातले  अभिलाषाचे सीन करताना खूप मजा येतीये आणि खूपच च्यालेंजिंग सुद्धा वाटत आहे. आम्ही सगळेच दिवस रात्र शूट करतोय.... असे कॅरेक्टर डेली सोप मध्ये मला साकारायला मिळतंय यात मी खूप समाधानी आहे....
 अभिलाषा  हे पात्र कसे आहे हे तुम्हाला वेगळे सांगायला नको... सध्या चाललेला ड्रामा खूप हेवी आहे... आणि त्या ड्रामाला तुम्ही माझे म्हणजे राधाचे मनापासून कौतुक करताय याचा खूप आनंद वाटतोय... पुढेही मी तुम्हाला असेच एंटरटेन करत राहणार आहे... अभिलाषाला इतक्या शेड्स आहेत ना... ह्याचे सगळे श्रेय आमची लेखिका मधुगंधा ताई, ज्योती ताई, आमचे डायरेक्ट रुपेश सर, श्याम,आमचे डी ओ पी साई सर आणि आमची प्रोड्युसर मनवा ताई यांना जाते... मला हे पात्र करायला मिळालंय या साठी मी तुमच्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे.... त्याला न्याय द्यायचा मी प्रयत्न करतीये आणि करत राहीन.... तूर्तास एवढेच... माझ्यावर आणि अभिलाषावर असेच प्रेम करत रहा....  कलर्स मराठीचे मनापासून धन्यवाद.’

राधाच्या या पोस्टनंतर तिचा मालिकेतील प्रवास लवकरच संपणार, असा अंदाज बांधला जातोय.   अभिनेत्री राधा सागरने  आभाराची पोस्ट लिहिली आहे तेव्हा तिचा या मालिकेतील प्रवास लवकरच संपणार अशी शक्यता असं मानलं जातंय. हे खरं असेल तर आता मालिकेत नवीन काय घडणार, लतिका अभिलाषाला धडा शिकवणार का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ या सिनेमात राधाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. चंद्राच्या मैत्रिणीची भूमिका तिने साकारली होती. ‘भिरकीट’  या चित्रपटातही ती दिसली होती.

Web Title: Sundara Manamadhe Bharli fame Abhilasha aka Radha Sagar post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.