Hrishikesh Shelar : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम दौलत होणार बाबा, शेअर केली गुड न्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 13:33 IST2022-12-25T13:33:07+5:302022-12-25T13:33:59+5:30
Hrishikesh Shelar : कलर्स मराठी वरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका जितकी लोकप्रिय झाली आणि तितकेच मालिकेतील कलाकारही लोकप्रिय झालेत. या मालिकेतला दौलत आठवतं असेलच.

Hrishikesh Shelar : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम दौलत होणार बाबा, शेअर केली गुड न्यूज
कलर्स मराठी वरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhye Bharali) ही मालिका जितकी लोकप्रिय झाली आणि तितकेच मालिकेतील कलाकारही लोकप्रिय झालेत. या मालिकेतला दौलत (Daulat ) आठवतं असेलच. नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या दौलतला तर या भूमिकेने नवी ओळख दिली. अभी आणि लतिका सोबतच दौलतही तितकाच प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या रांगडा अंदाज, त्याचा हटके लुक, त्याचे तेवढेच हटके संवाद सगळेच हिट झालेत. हाच दौलत आता बाबा होणार आहे.
होय, दौलतची भूमिका साकारणारा अभिनेता हृषिकेश शेलार (Hrishikesh shelar) लवकरच बाबा होणार आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली.
हृषिकेशने प्रेग्नंट बायकोसोबत मस्तपैकी फोटोशूट केलं आहे. मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो त्याने शेअर केले आहेत. या फोटोत हृषिकेशची बायको स्रेहा बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय.
हृषिकेश हा मूळचा सांगलीचा आहे. सांगलीतच त्याचा जन्म आणि शिक्षण झाले. त्याच्या बायकोचे नाव स्नेहा अशोक मंगल (काटे)असं आहे. ऋषिकेशची बायको ही सुद्धा अभिनेत्री आहे तिने अनेक नाटकांमधे काम केले आहे . ‘एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ या मालिकेत स्रेहाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
‘लक्ष्मी सदैव मंगलंम’ या मालिकेतून ऋषिकेशने आपल्या करियरची सुरुवात केली होती. या मालिकेत त्याच्यासोबत समृध्दी केळकर दिसली होती. त्यानंतर त्याने ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेत काम केलं. ‘शांतेचे कार्ट चालू आहे’ या नाटकांतही त्याने काम केलं आहे.