'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्रीच्या वडिलांच्या हाताला दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 15:36 IST2023-08-01T15:35:39+5:302023-08-01T15:36:03+5:30
Akshaya Naik : अभिनेत्री अक्षया नाईकने तिच्या वडिलांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्रीच्या वडिलांच्या हाताला दुखापत
कलर्स वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली'(Sundra Manamadhye Bharli)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेत लतिकाची भूमिका अभिनेत्री अक्षया नाईक(Akshaya Naik)ने साकारली आहे. तिला या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकताच तिने तिच्या वडिलांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अक्षया नाईकने शेअर केलेल्या या व्हिडीओत तिच्या वडिलांच्या हाताला बँडेज लावलेले दिसत आहे. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे, असं वाटतंय. पण याबाबत तिने माहिती दिलेली नाही. अक्षयाने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, बचेंगे तो और भी लढेंगे. आता ते ठिक आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. यामध्ये तिचे बाबा शहंशाह चित्रपटातील गाणे म्हणताना दिसत आहेत.
या व्हिडीओवर अदिती द्रविडने कमेंटमध्ये लिहिले की, काळजी घ्या. संग्राम समेळने लिहिले की, लवकर बरे व्हा काका. समीर परांजपेने म्हटले की, अरे काका... हे काय झालं?? लवकर बरे व्हा. अनेक जण ते लवकर व्हावे यासाठी प्रार्थना करत आहेत.