दौलतचा पराभव करुन लतिका- अभ्या करणार घरात प्रवेश; मकर संक्रांतीला मालिकेत येणार मोठा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 18:55 IST2022-01-13T18:52:16+5:302022-01-13T18:55:38+5:30
sundara mann madhe bharli: लतिका आणि अभ्या मकरसंक्रांतीच्या दिवशी त्यांच्या घरात गृहप्रवेश करतांना दिसत आहेत. इतकंच नाही तर आता या घरावरचं तुझं राज्य संपलं असं म्हणत अभ्या दौलतला धक्के मारुन त्यांच्या घरातून बाहेर काढतो.

दौलतचा पराभव करुन लतिका- अभ्या करणार घरात प्रवेश; मकर संक्रांतीला मालिकेत येणार मोठा ट्विस्ट
छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली. गेल्या काही दिवसांमध्ये अभ्या आणि लतिका यांच्या संसारात अनेक चढउतार आले. एकीकडे राहतं घर दौलतच्या ताब्यात गेलं. तर, दुसरीकडे अभ्याच्या आईचा मृत्यू झाला. या सगळ्यातून सावरत असतानाच अभ्या आणि लतिका त्यांचं घर दौलतच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येतं.
कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये लतिका आणि अभ्या मकरसंक्रांतीच्या दिवशी त्यांच्या घरात गृहप्रवेश करतांना दिसत आहेत. इतकंच नाही तर आता या घरावरचं तुझं राज्य संपलं असं म्हणत अभ्या दौलतला धक्के मारुन त्यांच्या घरातून बाहेर काढतो.
दरम्यान, सध्या या मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे जहागीरदारांचं घर आणि शेतजमीन मिळावी यासाठी दौलतने अनेक प्रयत्न केले होते. यात त्याने अभ्याच्या आईचा जीवदेखील घेतला. परंतु, त्याचं हे सत्य फार काळ लपलं नाही. अभ्या-लतिकाने त्याचं बिंग सगळ्यांसमोर फोडलं. सोबतच हेमाने त्याला साथ दिली हेदेखील उघड केलं. त्यामुळे आता अभ्याने दौलतला घरातून हाकलल्यानंतर दौलत पुढे काय करणार? पुन्हा तो सूड उगवणार का? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मात्र, त्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ही मालिका पाहिल्यावरच मिळतील.