सुनिधीने गायले धर्मेंद्र यांच्यासाठी गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 16:07 IST2018-08-16T16:00:25+5:302018-08-16T16:07:16+5:30

‘दिल है हिंदुस्तानी-2’मध्ये नामवंत अतिथी परीक्षकांनी हजेरी लावली आहे.  यावेळी या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांचे दोन्ही पुत्र- सनी व बॉबी- हे सहभागी झाले होते.

Sunidhi sing for Dharmendra | सुनिधीने गायले धर्मेंद्र यांच्यासाठी गाणं

सुनिधीने गायले धर्मेंद्र यांच्यासाठी गाणं

ठळक मुद्दे सुनिधी चौहानने खास धर्मेंद्र यांच्यासाठी ‘आज मौसम बडा बेईमान है’ हे गाणे गायले

‘दिल है हिंदुस्तानी-2’मध्ये नामवंत अतिथी परीक्षकांनी हजेरी लावली आहे.  यावेळी या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांचे दोन्ही पुत्र- सनी व बॉबी- हे सहभागी झाले होते. त्यामुळे परीक्षक सुनिधी चौहानने खास धर्मेंद्र यांच्यासाठी ‘आज मौसम बडा बेईमान है’ हे गाणे गायले. आपल्या चित्रपटांतील कामगिरीने इतकी वर्षे रसिकांचे मनोरंजन केलेल्या या बुजुर्ग अभिनेत्याने यावेळीही प्रेक्षकांवर आपली जादू टाकली. सुनिधी चौहान ही धर्मेंद्र यांची मोठी चाहती असून ते या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे तिला अत्यानंद झाला होता. तिने गायलेल्या या गीताला सर्व स्पर्धकांचीही साथ मिळाली आणि नंतर उर्वरित दोन्ही परीक्षक आणि सूत्रसंचालकही हे गाणे गाण्यात सहभागी झाले.

या घटनेसंदर्भात सुनिधी चौहान म्हणाली, “मी जेव्हा धरमजींना या मंचावर आलेलं पाहिलं, तेव्हा त्यांच्यासाठी मला खास गीत गाण्यावाचून राहावलं नाही. मी त्यांचे चित्रपट पाहातच लहानाची मोठी झाले असून आता त्यांच्यासाठी एक गाणं समर्पित करणं म्हणजे माझं स्वप्न पूर्ण होण्यासारखं होतं. त्यांच्याबरोबर एकाच मंचावर मला उपस्थित राहाता आलं, ही माझ्यासाठी भाग्याचीच गोष्ट होती.”

‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सीमा पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअ‍ॅलिटी शो आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवा आयाम देणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील हिंदुस्तानींचं एक संमेलनच भरलेलं असतं. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात.

Web Title: Sunidhi sing for Dharmendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.