'झांझरियाँ' गाण्यावर सुनील शेट्टी-करिश्मा कपूर थिरकले, माधुरीने शिट्टी वाजवत दिली दाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 13:08 IST2024-04-26T13:07:37+5:302024-04-26T13:08:53+5:30
90 च्या दशकातील हिट जोडी पुन्हा एकत्र झळकली.

'झांझरियाँ' गाण्यावर सुनील शेट्टी-करिश्मा कपूर थिरकले, माधुरीने शिट्टी वाजवत दिली दाद
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो 'डान्स दिवाने 4' मध्ये करिश्मा कपूरने (Karishma Kapoor) हजेरी लावली. माधुरी दीक्षित आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) या शोचे परीक्षक आहेत. यानिमित्ताने बऱ्याच वर्षांनी हे तिघेही एकत्र आले. माधुरी आणि करिश्माचा 'दिल तो पागल है' सिनेमातला डान्स फेसऑफ अप्रतिम होता. या शोमध्ये दोघींनी तो रिक्रिएट केला. तर करिश्माने सुनील शेट्टीसोबत 'झांझरिया' या आयकॉनिक गाण्यावरही डान्स केला.
1996 साली आलेला 'कृष्णा' हा सिनेमा खूप गाजला होता. त्याहीपेक्षा गाजलं सिनेमातलं 'झांझरियाँ उसकी छनक गयी ' गाणं. 'डान्स दिवाने' मध्ये करिश्मा आणि सुनील शेट्टीने या गाण्यावर डान्स केला. मेकर्सने या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. कॉमेडियन भारती सिंह सुनील आणि करिश्मा दोघांना बोलावते. या डान्स परफॉर्मन्ससाठी राजस्थानातून रेती मागवली आहे असं ती म्हणते. हे ऐकून सगळेच हसतात. मग सुनील आणि करिश्माचा डान्स परफॉर्मन्स होतो जो प्रेक्षक खूप एन्जॉय करतात. तर माधुरी दीक्षित शिट्टी वाजवत त्यांना दाद देते.
नेटकऱ्यांनी व्हिडिओवर कमेंट भरघोस कमेंट केल्या आहेत. 'ही जोडी हिट होती', 'आजही माझ्या मोबाईलमध्ये हे गाणं आहे'. 90 च्या दशकात सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूरने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. त्यांची जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी बनली होती. 'सपूत', 'गोपी किशन', 'रक्षक', 'बाज', 'रिश्ता' या सिनेमांचा समावेश आहे.