सुनील बर्वे आणि वीणा जामकर सांगतायेत 'बंध रेशमाचे'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2017 06:46 AM2017-03-17T06:46:57+5:302017-03-17T12:16:57+5:30
प्रेमाला कोणती भाषा आणि कोणतीही व्याख्या नसते.प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते. एकमेकांच्या नजरेतून दोन व्यक्ती प्रेमात पडतात.अशीच गोष्ट ...
प रेमाला कोणती भाषा आणि कोणतीही व्याख्या नसते.प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते. एकमेकांच्या नजरेतून दोन व्यक्ती प्रेमात पडतात.अशीच गोष्ट प्रेम हे ची चौथी लव्हस्टोरी असणार आहे. ही गोष्ट आहे दोन अश्या लोकांची ज्यांचे स्वतःचे आयुष्य एका वळणावर येऊन थांबले आहे. इशा आणि प्रसाद आणि यांच्यातील दुआ आहे प्रसादच पाळणाघर आणि ईशाचा मुलगा अद्वैत. प्रेम कधी कोणामध्ये आणि कोणत्या वळणावर होईल खरंच सांगू शकत नाही. सुनील बर्वे आणि वीणा जामकर यांच्या तगड्या अभिनयाने सजलेली एक सुंदर निरागस प्रेमकथा लकरच रसिकांना पाहता येणार आहे.
इशा एक स्वावलंबी स्त्री.एडव्हर्टाइसिंग प्रॉफेशनल. नवऱ्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर ती तिचा मुलगा अद्वैतबरोबर नवीन शहरात आलीय. अद्वैत लहान असल्यामुळे कामाला जाताना मुलासाठी घराजवळच पाळणाघर ठरवते. या पाळणाघराचा मालक आहे प्रसाद रणदिवे. एक अविवाहित पण हसतमुख आणि लहान मुलांमध्ये रमणारा,पाळणाघर एक व्यवसाय म्हणून नाहीतर एक चांगले कार्य म्हणून पाहणारा ४० -४५ वयोगटातील असा हा प्रसाद असतो.सुरुवातीला इशाला प्रसादच लहान मुलांसारखं वागणं जराही आवडतं नसत. पण जशी जशी ती त्याला ओळखू लागते तशी तशी ती प्रसादच्या प्रेमात पडू लागते. पण घटस्फोटित इशा आणि अविवाहित प्रसाद यांच्यात अजूनही काही असतं ज्यामुळे ही गोष्ट वेगवेगळी वळण घेते. इशा आणि प्रसादचे प्रेम फुलते कि खोट्या समाजासमोर झुकते.या वेगळ्या धाटणीची प्रेमकहानी रसिकांना पाहता येणार असून "बंध रेशमाचे" ही झी युवाची संकल्पना असून सुनील बर्वे आणि वीणा जामकर हे मुख्य भूमिकेत आहेत, तर गणेश पंडित यांच्या लेखणीतून कथा साकारली आहे आणि या गोष्टीचे दिग्दर्शन प्रवीण परब यांनी केले आहे.