सुनील बर्वेंची 'पारू' मालिकेत एन्ट्री, भूमिकेबद्दल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 07:50 PM2024-08-24T19:50:02+5:302024-08-24T19:50:40+5:30

Sunil Barve : प्रेक्षकांची पसंतीस उतरलेली मालिका 'पारू' या मालिकेमध्ये अहिल्यादेवींच्या भावाची म्हणजेच सयाजीरावची एन्ट्री झाली आहे. मराठीताल लाडका अभिनेता सुनील बर्वे झी मराठीवर ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा पदार्पण करत आहे.

Sunil Barve's entry in 'Paru' serial, said about the role... | सुनील बर्वेंची 'पारू' मालिकेत एन्ट्री, भूमिकेबद्दल म्हणाले...

सुनील बर्वेंची 'पारू' मालिकेत एन्ट्री, भूमिकेबद्दल म्हणाले...

प्रेक्षकांची पसंतीस उतरलेली मालिका 'पारू' या मालिकेमध्ये अहिल्यादेवींच्या भावाची म्हणजेच सयाजीरावची एन्ट्री झाली आहे. मराठीताल लाडका अभिनेता सुनील बर्वेझी मराठीवर ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा पदार्पण करत आहे. या निमित्ताने सुनील बर्वे यांनी झी मराठी सोबत काम करण्याची उत्सुकता व्यक्त केली. सुनील बर्वे म्हणाले, झी मराठीवर काम करण्याची उत्सुकता नेहमीच होती कारण झी मराठी मालिका विश्वातला पायनियर आहे आणि मी झी मराठी बरोबर एकदिलाने २०१२ पर्यंत काम केलंय. त्यामुळे एक आत्मीयता आहे, जशी दूरदर्शन केंद्रबद्दल आहे. जेव्हा पासून प्रायव्हेट चॅनेलची सुरुवात झाली तेव्हा पासून झी मराठीने अनेक कलाकारांच्या करियरला आकार देण्यास मदत केली आहे. तेव्हा पुन्हा झी मराठी सोबत काम करण्याची उत्सुकता वेगळीच आहे. सयाजीरावच्या भूमिकेसाठी मला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. 

ते पुढे म्हणाले की, जेव्हा सयाजीरावचा प्रोमो आला तेव्हा खूप जण म्हणत होते की नरसिंहराव परत आला. प्रेक्षकांना अजूनही माझी ११ वर्षापूर्वीची 'कुंकू' मालिका लक्षात आहे* . मला खूप आनंद झाला की लोकांच्या हृदयात ती मालिका आणि माझी भूमिका अजून ही ताजी आहे. मला जेव्हा 'पारू' मालिकेसाठी कॉल आला भूमिकेबद्दल सांगितले तेव्हा काही तरी नवीन करायला मिळणार आहे याचा आनंद झाला. प्रेक्षकांना मला स्क्रीनवर पाहिल्यावर नरसिंहची आठवण आली असेल पण सयाजीराव, खूप वेगळा आहे. सयाजीराव जरी गावचा कर्ताधर्ता असला तरी, एक माणूस म्हणून नरम स्वभावाचा आहे आणि तोच वेगळेपणा मला या भूमिकेसाठी ऊर्जा देत आहे. 


शूटिंगच्या अनुभवाबद्दल त्यांनी सांगितले की, सातारामध्ये शूटिंग करण्याचा अनुभव ही वेगळा आहे. जेव्हा तुम्ही घरापासून दूर राहून शूट करता तेव्हा ती मालिकेची टीम तुमच्या परिवारासारखी होते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी आऊटडोअर काम करायची मज्जा असते तशीच मज्जा आहे. 'पारू'च्या कलाकार टीम मध्ये बहुतेक नवीन पिढी आहे त्यांच्या सोबत आणि त्यांच्या पद्धतींनी काम करण्याची मला उत्सुकता आहे. 

Web Title: Sunil Barve's entry in 'Paru' serial, said about the role...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.