महिन्याला अवघे 500 रूपये कमावणारा सुनील ग्रोव्हर कसा बनला कॉमेडी किंग?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 12:29 PM2021-08-03T12:29:10+5:302021-08-03T12:30:46+5:30

Sunil Grover Birthday : कधी गुत्थी बनून तर कधी डॉक्टर गुलाटी बनून प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या सुनील ग्रोव्हरचे आज लाखो चाहते आहेत. पण टीव्ही ते बॉलिवूड हा प्रवास सुनीलसाठी सोपा नव्हताच.

sunil grover birthday special used to earn only 500 rupees month how he became king of comedy | महिन्याला अवघे 500 रूपये कमावणारा सुनील ग्रोव्हर कसा बनला कॉमेडी किंग?

महिन्याला अवघे 500 रूपये कमावणारा सुनील ग्रोव्हर कसा बनला कॉमेडी किंग?

googlenewsNext
ठळक मुद्देसुनीलने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये गुत्थीची भूमिका साकारून प्रेक्षकांना पोटधरून हसायला भाग पाडलं.

कॉमेडीयन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) याचा आज वाढदिवस. कधी गुत्थी बनून तर कधी डॉक्टर गुलाटी बनून प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या सुनील ग्रोव्हरचे आज लाखो चाहते आहेत. बॉलिवूडमध्येही त्यानं स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. पण टीव्ही ते बॉलिवूड हा प्रवास सुनीलसाठी सोपा नव्हताच. सुनीलची पहिली कमाई फक्त 500 रूपये होती. खुद्द त्यानेच हा खुलासा केला होता.  (Sunil Grover Birthday )

कॉमेडीयन सुनील ग्रोवरचा जन्म 3 ऑगस्ट 1977 साली हरियाणामधील सिरसा येथे झाला होता. लहानपणापासूनच चित्रपट पाहण्याची आवड असलेल्या सुनीलला शाहरूख व अमिताभ सारखं बनायचं होतं. नवव्या वर्गात असताना वडिलांनी सुनीला तबला शिकायला पाठवलं आणि मोठा झाल्यावर सुनीलला अभिनय खुणावू लागला. 

 12 व्या वर्गात असताना सुनीलनं एका नाट्य स्पर्धेत भाग घेतला होता. त्याचा अभिनय पाहून या स्पर्धेतील मुख्य अतिथींनी सुनीलला बोलावून घेतलं आणि तू अशा स्पर्धेत भाग घ्यायला नको. कारण हा दुसºयांसोबत अन्याय होईल, असं त्याला सांगितलं. यानंतर सुनीलनं थिएटरचे धडे गिरवले आणि नंतर मुंबईत आला. मुंबईत आल्यावर काही महिने त्यानं फक्त पार्ट्या केल्यात. मुंबईच्या पॉश भागात फ्लॅट भाड्यानं घेतला. तेव्हा तो फक्त 500 रूपये कमावायचा. पण लवकरच आपण यशस्वी बनू, असा मोठा विश्वास त्याला होता. पण काहीच दिवसांत त्याच्या या विश्वासाला तडा गेला. या शहरात आपल्यासारखे अनेकजण आहेत. शहरात आपण सुपरस्टार आहोत पण इथे फक्त स्ट्रगलर हे त्याच्या ध्यानात आलं.  जवळचे सर्व पैसे संपले. अर्थात स्वप्नं संपली नव्हती. यानंतर सुनीलने व्हॉईस ओव्हर म्हणून काम सुरू केलं. एका रेडिओत त्याला काम मिळालं. काही वर्षानंतर त्याला गुत्थीची भूमिका मिळाली आणि या भूमिकेनं त्याला घराघरात ओळख दिली.

 सुनीलने आपल्या करीयरची सुरुवात सर्वप्रथम रेडिओपासून केली.त्यानंतर त्याने टीव्हीकडे आपला मोर्चा वळवला.मध्यंतरी त्याने रिंकू भाभी या फेमस भूमिकेत एक व्हिडीओ सॉंगसुद्धा केलं होतं. या विनोदी गाण्याला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता.यातील सुनीलच्या विनोदी अभिनयाने चाहत्यांना हसवून लोटपोट केलं होतं. आजही हे गाणं खुपचं आंनदाने बघितलं जातं.

सुनीलने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये गुत्थीची भूमिका साकारून प्रेक्षकांना पोटधरून हसायला भाग पाडलं. त्यानंतर त्याने ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल; मध्ये डॉ.मशहूर गुलाठीची भूमिका साकारून चाहत्यांना हसवलं. 1998 मध्ये प्यार तो होना ही था या सिनेमातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पुढे द लीजेंड ऑफ भगत सिंह, मैं हू ना, गजनी, गब्बर इज बॅक, बागी, भारत अशा सिनेमात तो झळकला. तांडव आणि सनफ्लॉवर या वेबसीरिजमध्येही तो दिसला.

Web Title: sunil grover birthday special used to earn only 500 rupees month how he became king of comedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.