पृथ्वी वल्लभ या मालिकेत सुनील पलवल प्रेक्षकांना दिसणार वेगळ्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 08:43 AM2018-02-22T08:43:03+5:302018-02-22T14:13:03+5:30
सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवरील 'पृथ्वी वल्लभ' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ही मालिका प्रेक्षकांना अधिकाधिक आवडावी यासाठी या मालिकेची ...
स नी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवरील 'पृथ्वी वल्लभ' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ही मालिका प्रेक्षकांना अधिकाधिक आवडावी यासाठी या मालिकेची संपूर्ण टीम प्रयत्न करत आहे. सुनील पलवल या मालिकेमध्ये सिंधूची भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या आगामी भागात सिंधूचे एक नवे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिंधू आता दारुडा झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे मद्यपीची भूमिका साकारण्यासाठी सुनील खूप उत्सुक आहे. मद्यपी दारू प्यायल्यानंतर कशाप्रकारे बोलतो, त्याचे हावभाव, देहबोली कशाप्रकारे असते याचा त्याने चांगला अभ्यास केला आहे. मालिकेतील या भागांचे चित्रीकरण त्याने करायला देखील सुरुवात केली आहे आणि तो ही भूमिका खूप चांगल्या प्रकारे साकारत असल्याचे त्याच्या टीममधील प्रत्येकाचे म्हणणे आहे. त्याचे सहकलाकार त्याची प्रचंड प्रशंसा देखील करत आहेत. याविषयी सुनील पलवल सांगतो, “सिंधूचे माझे पात्र संपूर्ण दिवस दारूच्या नशेत असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मला प्रत्येक दृश्यामध्ये दारुड्याप्रमाणे वागणं गरजेचे होते. म्हणून मी पात्रात एकरूप होण्यासाठी खूपच मेहनत घेतली. मी अल्कोहोलचा पर्याय म्हणून सफरचंद ज्यूसच्या ८-९ बाटल्यांचे सेवन केले होते. सोनालिका भडोरियासह सगळ्याच माझ्या सहकलाकारांनी मला सांगितले की मी हे दृश्य खूपच चांगल्या प्रकारे केले. सिंधू या भूमिकेवर मी सुरुवातीपासूनच मेहनत घेत आहे. मालिकेचे चित्रीकरण सुरू होण्याआधी मी माझ्या पात्राबद्दल खूप संशोधन केले. कारण या मालिकेतील माझी व्यक्तिरेखा दहाव्या शतकातील आहे. त्यामुळे या मालिकेचा काळ समजून घेणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. या मालिकेतील भाषा ही खूप वेगळी असल्याने ती समजून घेण्यासाठी मी कालिदास यांनी लिहिलेली शकुंतला कादंबरी वाचली. तसेच मुकेश छाब्रा यांनी पूर्वी मला शापूरजी पल्लानजीच्या क्लासिक नाटक मुगल-ए-आझम या नाटकासाठी कास्ट केले होते. त्यामुळे मी कशाप्रकारे काम करतो याची त्यांना चांगली कल्पना होती. माझी ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत असल्याचा मला आनंद होत आहे.
Also Read : पृथ्वी वल्लभमधील जितिन गुलाटी कंटाळला या गोष्टीला
Also Read : पृथ्वी वल्लभमधील जितिन गुलाटी कंटाळला या गोष्टीला