हेमा मालिनीच्या मुलींबरोबर कसं नातं आहे? करण जोहरच्या प्रश्नावर सनी देओलचं स्पष्ट उत्तर, म्हणाला, "मला वाटलं नव्हतं पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 17:27 IST2023-11-02T17:22:04+5:302023-11-02T17:27:23+5:30
'गदर २'च्या निमित्ताने धर्मेंद्र यांची चारही मुलं पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली होती.

हेमा मालिनीच्या मुलींबरोबर कसं नातं आहे? करण जोहरच्या प्रश्नावर सनी देओलचं स्पष्ट उत्तर, म्हणाला, "मला वाटलं नव्हतं पण..."
सनी देओल आणि बॉबी देओल यांनी त्यांची सावत्र आई अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या मुली अहाना आणि ईशा देओलसोबतच्या त्यांच्या बाँडिंगबद्दल खुलासा केला आहे. देओल ब्रदर्सने करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. ऑगस्टमध्ये गदर 2 च्या स्क्रिनिंगला सनी-बॉबी सावत्र बहिणी अहाना आणि ईशासोबत पहिल्यांदा सार्वजनिकपणे दिसले होते. ईशाने तिच्या जवळच्या मित्रांसाठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी ऑगस्टमध्ये तिच्या घरी 'गदर २'चं स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं होते. स्क्रिनिंगदरम्यान ईशा आणि आहानासोबत पोजही दिल्या. धर्मेंद्र यांची चारही मुलं सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ होती.
जेव्हा करण जोहरनेसनी देओलला शोमध्ये अहाना आणि ईशा या दोघींच्या बॉन्डिंगबद्दल विचारले तेव्हा सनी म्हणाला, 'त्या माझ्या बहिणी आहेत. त्यात काहीही बदल होत नाही. त्या खूप आनंदी होत्या. सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे चित्रपट यशस्वी झाला. मी सगळीकडे जात होतो. मला सक्सेस पार्टी करायची होती. पण मी गोंधळलो होतो की ‘सगळे येतील की नाही?’ माझा मित्र करीमही माझ्यासोबत होता जो इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना ओळखतो. त्याने सर्व काही केले. संध्याकाळपर्यंत त्यात कोण कोण सहभागी होणार याची खात्री नव्हती. पण सर्वजण ज्या पद्धतीने आले आणि सर्वांनी ज्याप्रकारे प्रेम दिले, ते पाहून मला खूप आनंद झाला.
धर्मेंद्र यांचे कुटुंब बॉलिवूडमधील सर्वात आवडते आणि प्रसिद्ध कुटुंब आहे. प्रत्येकजण त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न 1954 मध्ये प्रकाश कौर यांच्यासोबत झाले होते. यानंतर 1980 मध्ये त्यांनी हेमा मालिनीसोबत दुसरे लग्न केले. त्याच्या पहिल्या लग्नापासून त्याला चार मुले आहेत: सनी देओल, बॉबी देओल, अजिता आणि विजेता. धर्मेंद्रच्या हेमा मालिनी यांना ईशा देओल आणि आहाना देओल या दोन मुली आहेत.