सुप्रिया पाठारेंच्या मुलाचं नवं हॉटेल पडलं बंद? अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सांगितलं सत्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 12:26 PM2023-11-03T12:26:11+5:302023-11-03T12:28:40+5:30
अभिनेत्री सुप्रिया पाठारे सध्या त्यांच्या मुलाच्या नव्या व्यावसायामुळे चर्चेत आहे.
मराठी कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे सध्या त्यांच्या मुलाच्या नव्या व्यावसायामुळे चर्चेत आहे. सुप्रिया पाठारे यांच्या मुलगा मिहिरने गेल्या काही महिन्यांपूर्वी 'महाराज' नावाचं हॉटेल सुरू केलं. पण, आता हे हॉटेल बंद झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर खुद्द सुप्रिया पाठारे यांनी व्हिडीओ शेअर करत सत्य सांगितलं.
सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्या म्हणतात, 'तुम्हा सगळ्यांना माहित आहे की ठाण्यात खेवरा सर्कल इथे आपलं ‘मharaj’ हॉटले आहे. तिथे स्पेशल पावभाजी मिळते. तुम्ही सगळ्यांनी आजवर तिथे येऊन आस्वाद घेतला आहे. खूपशा गोष्टी कानावर आल्या. हे हॉटेल गेल्या १०-१५ दिवसांपासून बंद होतं. त्यामुळं हे हॉटेल बंद झाल्याची कुजबुज सुरू झाली होती'.
पुढे त्या म्हणतात, 'मला आणि माझ्या मुलाला यासंदर्भात अनेकांचे फोन आले. पण, असं काहीही नाही. २१ ऑक्टोबर रोजी माझी आईचं निधन झालं. त्यामुळे आम्ही हॉटेल बंद ठेवलं होतं. कालच आई कार्य झालं. व्यवसाय आहे तो सुरू ठेवायलाच पाहिजे. त्यामुळं ३ तारखेपासून पुन्हा हॉटेल सुरू होणार आहे. तेव्हा सगळ्यांनी नक्की या'. त्यांच्या या व्हिडीओनंतर सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
सुप्रिया यांचा मुलगा मिहीर पाठारे हा प्रोफेशनल शेफ आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने विदेशात लोकप्रिय असलेली फूड ट्रक ही संकल्पना ठाण्यात सुरु केली. ‘मharaj’ असं त्याच्या फूड ट्रकचं नाव होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंर मिहीरने आता ‘मharaj’ पावभाजी आणि फास्ट फूट कॉर्नर हे नवीन हॉटेल सुरु केलं आहे.
सुप्रिया यांनी अनेक नावाजलेल्या कलाकारांसोबत काम केलं. 'फु बाई फु', 'जागो मोहन प्यारे', 'मोलकरीणबाई', 'श्रीमंताघरची सून', 'चि. व चि. सौ कां', 'बाळकडू' अशा चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळाले. नुकतेच त्या स्टार प्रवाहवरील 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या होत्या. या मालिकेमध्ये त्यांनी माधवी विनायक कानिटकर (माई) ही भूमिका साकारली होती.