‘सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमात तुम्ही अशाप्रकारे सहभागी होऊ शकता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 02:48 PM2018-07-12T14:48:02+5:302018-07-12T14:50:45+5:30

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा प्रवास सुरू झाला आहे. आता “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर” कार्यक्रम १४ आणि १५ जुलै रोजी येत आहे अनुक्रमे मुंबई आणि ठाणे या शहरांमध्ये  नवीन पर्वाच्या ऑडिशन्स घेऊन.

sur nava dhyas nava auditions | ‘सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमात तुम्ही अशाप्रकारे सहभागी होऊ शकता...

‘सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमात तुम्ही अशाप्रकारे सहभागी होऊ शकता...

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरू झाला, तेव्हा कार्यक्रमामधील गायकांनी गायलेली विविध शैलींमधील गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. एक आश्चर्याचा सुखद धक्का या गायकांनी कार्यक्रमाच्या प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच प्रेक्षकांना दिला. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि म्हणूनच सूर नवा ध्यास नवाच्या पहिल्या पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर आता कलर्स मराठी घेऊन येत आहे “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर”. या पर्वामध्ये देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे... परंतु मंचावर असणार आहेत लहान मुले. ६ ते १५ वयोगटातील बच्चेकंपनी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा प्रवास सुरू झाला आहे. आता “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर” कार्यक्रम १४ आणि १५ जुलै रोजी येत आहे अनुक्रमे मुंबई आणि ठाणे या शहरांमध्ये  नवीन पर्वाच्या ऑडिशन्स घेऊन. तुमचे सुरेल गाणं ऐकायला महाराष्ट्र आतूर आहे, तेव्हा तयार रहा... या पर्वाचा शुभारंभ ऑगस्ट मध्ये होणार असून याचे परीक्षक असणार आहेत आपल्या सगळ्यांचा लाडका अवधूत दादा, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे सध्या गुलदसत्यात आहे. या आधीच्या सिझनचे सूत्रसंचालन तेजश्री प्रधानने केले होते. 
“सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर” या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स मुंबई आणि ठाणे येथे अनुक्रमे १४ आणि १५ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत होणार आहेत. हे ऑडिशन मुंबईत आय. इ. एस. मॉडर्न हायस्कूल (अॅशलेन), डी एस बाब्रेकर मार्ग, साने गुरुजी शाळेमागे, दादर (प) तर ठाण्यातील ब्राम्हण महाविद्यालय, घंटाळी देवी मंदिर रोड, तीन पेट्रोल पंपजवळ, नौपाडा, ठाणे (प) येथे होणार आहेत. 
‘सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमात तुम्हाला देखील सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही देखील ऑडिशनला नक्की जा... 

Web Title: sur nava dhyas nava auditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.