सुरभी चंदनाने दाखविली आपल्या गायन कौशल्याची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 01:31 PM2018-10-25T13:31:32+5:302018-10-25T13:54:52+5:30

स्टार परिवार पुरस्कार २०१८ सोहळ्यात सुरभीने मोस्ट स्टायलिश सदस्य हा पुरस्कार पटकाविला.

Surabhi Chandana shown singing skills | सुरभी चंदनाने दाखविली आपल्या गायन कौशल्याची झलक

सुरभी चंदनाने दाखविली आपल्या गायन कौशल्याची झलक

googlenewsNext
ठळक मुद्देसुरभीने गायले 'इश्कबाझ' मालिकेचे 'ओ जाना' हे शीर्षकगीत


स्टार प्लसवरील 'इश्कबाझ' या लोकप्रिय मालिकेत अन्निकाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सुरभी चंदनाने आपल्या अंगी बऱ्याच कला असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्टार परिवार पुरस्कार २०१८ सोहळ्यात सुरभीने मोस्ट स्टायलिश सदस्य हा पुरस्कार पटकाविला. तो पुरस्कार स्वीकारण्यास ती व्यासपीठावर गेली असता तिच्या मालिकेतील सहकलाकारांच्या आग्रहास्तव तिने 'इश्कबाझ'चे शीर्षकगीत गायले.


या पुरस्कार सोहळ्यात सुरभीने आपल्या मालिकेचे 'ओ जाना' हे शीर्षकगीत गायले, तेव्हा तिचा सुरेल आणि गोड आवाज ऐकून उपस्थित मंत्रमुग्ध झाले. सुरभीला ओळखणाऱ्या एका सूत्राने सांगितले, ''सुरभी ही एक कसलेली गायिका आहे, ही गोष्ट फारच कमी लोकांना ठाऊक आहे. मात्र तिला सार्वजनिक समारंभात गाण्याचा संकोच वाटतो.''
'इश्कबाझ'मधील तिच्या सहकलाकारांना ती उत्तम गायिका आहे, याची महिती असून ते तिच्या आवाजाचे चाहते आहेत. ते तिला सेटवर वारंवार गाणी गाण्याचा आग्रह करीत असतात. म्हणूनच त्यांनी या पुरस्कार सोहळ्यात संधी साधून तिला व्यासपीठावर गायला लावले आणि तिच्या या गायन कलेची ओळख जगाला करून दिली. ती पुरस्कार स्वीकारण्यास जात होती, तेव्हा तिचे सहकारी तिला ‘ओ जाना’ हे शीर्षकगीत गाण्याचा आग्रह करीत होते. अखेरीस त्यांच्या आग्रहाला मान देऊन सुरभीने ते गाणे गायले. तिचा सुरेल आवाज ऐकून श्रोते प्रथम आश्चर्यचकित झाले आणि नंतर आनंदले. त्यामुळे ते तिला प्रोत्साहन देत होते. या गुणी अभिनेत्रीला करता येत नाही, अशी काही गोष्ट आहे का? ती एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून आता ती एक उत्तम गायिकाही आहे, हेही दिसून आले आहे. स्टार परिवार पुरस्कार २०१८ सोहळा लवकरच स्टार प्लसवर प्रसारीत होणार आहे.

Web Title: Surabhi Chandana shown singing skills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.